स्वागत0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मित्रहो,

कडेगाव आणि पलुस तालुका हा प्रगतीपथावरचा परिसर. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, शेती, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या ही जागृत आणि क्रांतीकारक भूमी. याच भूमीतुन ज्येष्ठ नेते, आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या रूपानं आधुनिक महाराष्ट्राचा अंकुर फुलला. याच भूमीनी महाराष्ट्राच्या जडण घडणीला मोलाचा हातभार लावला. नव्या पिढीनं आजही ही परंपरा अव्याहतपणे चालू ठेवलीय. केवळ समाजमनाचा आरसा नव्हे तर त्याही पुढे जावून परिवर्तनाच्या कार्यात स्वत:ला झोकुन देणा-या मिडीयानंही आता अत्याधुनिक तंत्राचा वापर करून इथल्या वाचकांना, जनसामान्यांना जगभरातलं अधिक चांगलं आणि उत्तमोत्तम देण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कडेगाव आणि पलुस तालुक्याचं पहिलं ऑनलाईन न्युज पोर्टल आम्ही घेवून येत आहोत. ‘कडेगाव-पलुस लाईव्ह न्युज’ असं नाव असणा-या या ऑनलाईन न्यूज पेपरमध्ये केवळ घटना, घडामोडी, बातम्या नव्हे तर या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही लागेल ते देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या एका ऐतिहासिक कार्यात सर्वात मोठा सहभाग असेल तो या परिसरातल्या आमच्या जाणकार आणि जागृत वाचकांचा. त्यांच्या प्रतिसादाशिवाय याला अपेक्षित गती मिळू शकणार नाही. तेव्हा माध्यम क्षेत्रातल्या आणखी एका अत्याधुनिक आविष्कारासाठी तयार रहा…लवकरच येत आहोत कडेगाव-पलुस तालुक्याचं पहिलं ऑनलाईन न्युज पोर्टल घेवून…‘”कडेगाव पलुस लाईव्ह न्युज”

Leave a Reply

Your email address will not be published.

स्वागत

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0