गोरख तावरे यांना स्टार आयकाॅन पुरस्कार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कराड : प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या विधायक कार्याची दखल घेवून पत्रकारीता या माध्यमासाठी स्टार आयकाॅन पुरस्कार जाहीर झाला आहे.२८ ऑगस्ट रोजी कराड येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.

भास्कर भूषण वर्धापनदिनाचे औचित्य साधून सदरचा पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह,मानपत्र,शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप आहे. २८ ऑगस्ट रोजी वेणूताई चव्हाण स्मारक येथे हा समारंभ होणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस,माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर,नगराध्यक्षा सौ.संगिता देसाई, अभिनेते वसंत अवसरीकर, कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.अशोक चव्हाण, मुख्याधिकारी विनायक औंधकर,रत्नशास्त्री एच.ए.मोतीवाल, डाॅ.उदय ठिगळे, डाॅ.मुग्धा रेठरेकर, कमलाकर पाटील, आबासाहेब गावडे, डाॅ.नरेंद्र माळी यांच्या उपस्थितीत गौरव समारंभ होणार असल्याची माहिती डाॅ.राजीव लोहार यांनी दिली.

गोरख तावरे यांना यापुर्वी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. गेली २५ वर्षे कराड येथे सकारात्मक पत्रकारीता करीत आहेत. दैनिक सामना,साप्ताहिक राजसत्य व दैनिक लक्ष्मीपुत्र या वृत्तपत्रांमधून विविध विषयावर गोरख तावरे लिखान करीत असतात. प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषद या संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र आणि पत्रकारांचे प्रश्न,समस्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. राज्यातील सर्वच वृत्तपत्रांना शासनस्तरावर सन्मान मिळाला पाहिजे,शासनाने जाहिरातीद्वारे वृत्तापत्रांना मदत करावी आणि राज्यातील पत्रकारांना सन्मानाने जगता यावे यासाठी पत्रकारांना चांगला पगार मिळावा,जेष्ठ पत्रकारांना शासनाने पेन्शन दयावी अशी आग्रही भूमिका गोरख तावरे शासन दरबारी सातत्याने मांडताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

गोरख तावरे यांना स्टार आयकाॅन पुरस्कार

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
संपादकीय झोंबणार का ?

अट्टल तिखट खाणाऱ्या आमच्या वाचकांना आमचे संपादकीय लेख नक्कीच चांगली मेजवानी देतील. पण आमचे संपादकीय लेख ज्यांच्यावर लिहिले जातील त्यांना

Close