डॉ. नागशेट्टी ह्यांचे लिंगायत युवाकडून अभिनंदन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: लिंगायत धर्माचे प्रसिद्ध अभ्यासक व तज्ञ शरण नागशेट्टी शेटकर ह्यांनी १९ ऑगस्ट २०१६ “लिंगायत धर्माचा दार्शनिक अभ्यास” ह्या विषयावरील प्रबंध सादर करून मुंबई विद्यापीठाची पीएच डी ही डिग्री मिळवली. डॉ. नागशेट्टी हे कित्येक वर्षापासून लिंगायत एकीकरण व लिंगायत धर्माचा हिंदू व जैन धर्मासोबत तौलनिक अभ्यास ह्यावर विविधांगी दृष्टीकोनातून काम करत आहेत.

ह्या आधी त्यांनी “लिंगायत धर्मासोबत हिंदू धर्माचा तौलनिक अभ्यास” आणि “लिंगायत धर्माचे वैश्विकीकरण” अशी दोन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. ह्याबरोबरच लिंगायत धर्म, आद्यक्रांतीगुरू व लिंगायत धर्मसंस्थापक बसवन्ना ह्यांचे क्रांतीकारी कार्य, आणि दार्शनिक स्वरूपातील इतर लिंगायत तात्विक मुल्ये ह्यावर त्यांचा गाढा अभ्यास वेगवेगळ्या प्रबंधांच्या व लेखांच्या माध्यमातून सिद्ध केला आहे.

IMG_20160821_164431

IMG_20160821_164717

मुंबई विद्यापीठामधे सादर केलेल्या प्रबंधास डॉ. एम एस खुराडे व आय आय टी मुंबईचे प्राध्यापक डॉ. रंजन पंडा ह्यांनी मार्गदर्शन केले. “लिंगायत धर्माचा दार्शनिक अभ्यास” हे लिंगायत धर्मियांसाठी खूप मोठे योगदान असल्यामुळे डॉ. नागशेट्टी शेटकर ह्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. लिंगायत युवा चे सल्लागार व हेमवर्ल्ड चे हेमंत चिंचकर तसेच ज्येष्ठ पत्रकार अर्जुन धस्के ह्यांनी डॉ. शेटकर ह्यांचे विशेष अभिनंदन केले. डॉ. सुधीर कुंभार, लेखिका रश्मी मालापूर, डॉ. गोविंद धस्के, दिपक कोकणे, आणि गजानन धस्के ह्यांनी डॉ. शेटकर ह्यांना विशेष शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

डॉ. नागशेट्टी ह्यांचे लिंगायत युवाकडून अभिनंदन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
गोरख तावरे यांना स्टार आयकाॅन पुरस्कार

कराड : प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या विधायक कार्याची दखल घेवून पत्रकारीता या

Close