पडळकरवाडी बनले लोकराज्यग्राम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली : राज्य शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती व त्यांचा लाभ घेऊन सामान्य नागरिकाने केलेली प्रगती खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली की इतरांनाही प्रेरणा मिळते. याची जाण असलेले आटपाडी येथील डॉ.उत्तम नामदेव पडळकर यांच्या सहकार्याने पडळकरवाडी हे गाव लोकराज्य ग्राम झाले आहे.

शासनाचे मुखपत्र असलेल्या `लोकराज्य` मासिकाचे वर्गणीदार करण्याची मोहीम राज्य शासनाने राज्यभर हाती घेतली आहे. `लोकराज्य` मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, राबविण्यात येणाऱ्या योजना आणि त्यांचा जनमानसावर झालेला परिणाम याविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात येते. तसेच मासिकामध्ये शासन निर्णय, मंत्रीमंडळ निर्णय, विविधांगी माहितीपूर्ण सदरे प्रसिद्ध करण्यात येतात.

आटपाडीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्याकडे काही कामानिमित्त सौ. संगीता उत्तम पडळकर आल्या होत्या. त्यावेळी मीना साळुंखे यांच्याबरोबर चर्चा करत असताना लोकराज्यबद्दल श्रीमती पडळकर यांना माहिती मिळाली. चांगल्या कामासाठी सदैव पुढाकार घेण्याची वृत्ती असलेल्या संगीता पडळकर यांनी त्यांचे पती डॉ.उत्तम पडळकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर डॉ.पडळकर यांनी पडळकरवाडी या गावातील सर्व ११७ कुटुंबप्रमुखांच्या नावे स्वखर्चाने लोकराज्य वर्गणी जमा करण्याची तयारी केली.

आटपाडी येथे गटविकास अधिकारी कार्यालयात पडळकर दाम्पत्याने ही वर्गणी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी गटविकास अधिकारी मीना साळुंखे, विस्तार अधिकारी व्ही. एन. शिंदे, ग्रामसेवक भूषण गांगुर्डे यांच्यासह अन्य उपस्थित होते. यापूर्वी मे महिन्यात याच तालुक्यातील मिटकी हे गाव लोकराज्यग्राम झाले आहे.

यावेळी गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी लोकराज्य मासिकामुळे तालुका आणि ग्रामस्तरावर शासकीय योजना पोहोचत असल्याचे सांगून लवकरच पात्रेवाडी आणि गुळेवाडी ही गावे लोकराज्य ग्राम करण्याचा मनोदय व्यक्त केला. प्रगतशील आणि सुशिक्षीत वातावरण असलेल्या पडळकरवाडीतील ग्रामस्थांना लोकराज्य मासिकाचा नक्कीच लाभ होईल, असे मत डॉ. पडळकर यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना संप्रदा बीडकर यांनी लोकराज्यविषयी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

पडळकरवाडी बनले लोकराज्यग्राम

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
फेसलेस क्राईमचे आव्हान

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ई-बँकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मीडिया आदिंचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे अद्ययावत तंत्रज्ञान प्रगतीसाठी जसे

Close