या जगण्यावर..कसे हे प्रेम करावे ?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पिंपरी चिंचवड :  या जन्मावर…जगण्यावर शतदा प्रेम करण्यास शिकविणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या धाकट्या मुलाला जीवन जगणेही महाग झाले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड पुलाखाली अक्षरश: भिकाऱ्याचं जीणं जगण्याची वेळ संगीत दाते यांच्यावर आली आहे. त्यातच व्याधींनी ग्रासल्याने त्यांची प्रकृती आणखी रोडावली आहे.

चांगल्या घरातील व्यक्ती वाकड पुलाखाली गेल्या सहा दिवसांपासून अन्न-पाण्यावाचून पडून आहे. ‘मोठय़ा भावाने मला वडिलांच्या संपत्तीतून बेदखल केले आहे. पुण्यात हॉटेल व्यवसायासाठी मसाल्यांची चौकशी करण्यासाठी आलो होतो. जुनी पेठमध्ये जात असताना एका वाहनाने मला धडक दिली आणि मी रस्त्यावरच बेशुद्ध पडलो. माझ्या हातातील बॅग, मोबाइल, पाकीट, चेकबुक, एटीएम, बॅगेमधील कागदपत्रं सगळ काही चोरीला गेलं आहे. एका रिक्षाचालकाने 108 ला फोन करून मला मदत केली. ससून रुग्णालयामध्ये दाखल झालो. तिथे 20 दिवस उपचार घेतले. तिथून इथपर्यंत कसा आलो, हे माहीत नाही. मात्र, रिक्षातून तिघा-चौघांनी मला बळजबरीने ढकलून इथे टाकले, इतके आठवते. त्यामुळे पायाला जखम झाली. ती सहन न झाल्याने रडत असताना एका भिकाऱ्यामने मला चादर आणि अंथरुण दिले, दरम्यान, चार वर्षांपुर्वीच अरुण दातेंनी संगीत दातेला कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यांनी स्वत: संगीत दातेंना संपत्तीतून बेदखल केलं आहे, अशी माहिती अरुण दाते यांचा मोठा मुलगा अतुल दातेंनी दिली आहे. संगीतने अरुण दातेंचं घरही विकलं. देणेकऱ्यांचे पैसे आम्ही भरले. संगीतकडे दारुच्या व्यसनासाठी पैसे कुठून येतात, माहित नाही. पण दारु पिऊन कुठेही पडलेला असतो, असे अनेकांचे फोन आम्हाला येतात, असंही त्यांनी सांगितलं.

 

फोटो सौजन्य: Saregama

Leave a Reply

Your email address will not be published.

या जगण्यावर..कसे हे प्रेम करावे ?

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देणार

मुंबई प्रतिनिधी: राज्यातील विनाअनुदान तत्त्वावर तसेच कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या व मुल्‍यांकनादरम्यान अनुदानास पात्र ठरलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व

Close