इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कडेगावमध्ये उपलब्ध0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : इको-फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करणे गेल्या काही वर्षापासून आव्हान बनून राहिले आहे. गणेश मंडळे व घरगुती गणेश पूजा ह्यांचे माध्यमातून होणाऱ्या ध्वनी प्रदूषण तसेच पर्यावरणीय दुष्परिणामांचे , विशेषतः जलस्त्रोतांच्या प्रदूषणाची अनेक उदाहरणे समोर आल्यापासून  “इको-फ्रेंडली गणपती उत्सव” साजरा करण्याकडे कल वाढला आहे. परंतू, कोणत्या बाबतीत पर्यावरणीय आणि  श्रद्धा-परंपरा ह्याच्यांशी सुसंगत गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, ह्याविषयी सामान्य नागरीक व तज्ञ ह्यांच्यामध्ये एकवाक्यता नव्हती.

IMG-20160901-WA0001

प्लास्टर च्या गणेशमूर्ती आणि त्यावरील रंगामुळे होणारे प्रदूषण समोर आल्यानंतर मातीच्या आणि सेंद्रिय रंगांच्या मूर्तीकडे कल वाढला होता, परंतू अश्या मूर्तींसाठीचे लोकआंदोलन नव्हते. अलीकडे बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थाने इको-फ्रेंडली अश्या गणेशमूर्ती बाजारामधे उपलब्ध झाल्या आहेत. 

IMG-20160901-WA0005

 

ह्या गणेशमूर्ती गोबर-गणेश ह्या नावाने सध्या बाजारात वितरीत केल्या जातायत. स्वर्गीय राजीव दिक्षित ह्यांच्या संशोधन व चळवळीने प्रेरित अश्या ह्या गणेशमूर्ती पंचगव्य गोबर, गोमुत्र, गोदुध, गोदही, आणि गोतूप अश्या विशिष्ट पदार्थांच्या संयोगाने बनवण्यात आल्या आहेत. हा गोबर गणेश फक्त पाण्यात लवकर विरघळेल म्हणून  इको-फ्रेंडली नाही तर त्यापासून होणारे खत जमिनीचे पोषण मुल्य वाढवते असा दावा मूर्तिकारांकडून केला जातोय.

IMG-20160901-WA0004

 

एकूणच, इको-फ्रेंडली गणपत्युत्सव हा विषय फक्त लोकश्रद्धेचा भाग न राहता तो पर्यावरणीय संशोधन व लोकआंदोलन ह्याकडे मोठ्या प्रमाणात झुकत आहे.

ज्येष्ठ पत्रकार सदानंद माळी व कडेगाव येथील सुदर्शन स्वदेशी सेवा केंद्र ह्यांच्या माध्यमातून इको-फ्रेंडली गणेश मूर्तींचे वितरण सुरु आहे. 

 

New Microsoft PowerPoint Presentation

इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कडेगावमध्ये उपलब्ध

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
या जगण्यावर..कसे हे प्रेम करावे ?

पिंपरी चिंचवड :  या जन्मावर...जगण्यावर शतदा प्रेम करण्यास शिकविणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या धाकट्या मुलाला जीवन जगणेही महाग झाले आहे. पिंपरी

Close