देवराष्ट्रेत आज कुस्त्यांचे मैदान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

देवराष्ट्रे: दरवर्षी श्रावणात होणारे देवराष्ट्रे येथील कुस्त्यांचे भव्य मैदान ह्यावर्षी आज भरत आहे.  सुमारे १२५ वर्ष जुनी परंपरा असलेले हे कुस्त्यांचे मैदान दरवर्षी श्रावण महिन्याच्या  शेवटच्या मंगळवारी भरत होते परंतू ह्यावर्षी गावकऱ्यानी एकत्रितपणे निर्णय घेऊन आज म्हणजे भाद्रपद महिन्यात कुस्त्यांचे आयोजन केले आहे.  सदर कुस्त्यांचे मैदान येथील क्रांतिसिंह नाना पाटील मैदानामधे भरवण्यात येणार आहे. मैदानाची सर्व तयारी सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.  ह्या कुस्तीमैदानांत सर्वात मोठ्या कुस्तीला २ लाख रुपयांचे बक्षीस व दुचाकी देण्यात येणार आहे.

परिसरातीलच नव्हे तर दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक येथील मल्लांच्या पसंतीचे म्हणून हे कुस्त्यांचे मैदान ओळखले जाते. निसर्गरम्य सागरेश्वर परिसर हा येथील अभयारण्य, ऐतिहासिक सागरेश्वर मंदिर, आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ह्यांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो.

फोटो सौजन्य: twitsnaps.com

देवराष्ट्रेत आज कुस्त्यांचे मैदान

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
रिलायन्स jio ची ग्राहकांना ‘जी भरके’ ऑफर!!!

मुंबई : सध्या चर्चेत असलेल्या रिलायन्स Jio 4G मुळे भारतात नव्या डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे. 50 रुपयांत1 GB डाटा,

Close