प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पदावरून हटवण्‍यात आले0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
पणजी : भाजप सरकारच्‍या विरोधात आंदोलन छेडले म्‍हणून गोव्याचे संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पदावरून हटवण्‍यात आले आहे. शिक्षणाच्या माध्यम प्रश्‍नावरून ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’च्या झेंड्याखाली प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आंदोलन केले. भाजपविरुद्ध राजकीय पर्याय देण्याच्या त्यांच्या घोषणेमुळे संघाने हा निर्णय घेतल्‍याचे बोलले जाते. वरिष्ठांच्या सूचनेवरून प्रांत कार्यकारिणीमार्फत त्यांच्यावर ही कारवाई केली गेली. दरम्यान, वेलिंगकर यांना पदावर दूर केल्यानंतर संघाच्या ४०० स्वयंसेवकांनी राजीनामे दिले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याची मागणी करून मंचातर्फे आंदोलन छेडण्यात आले आहे. प्रा. वेलिंगकर हे मंचाचे समन्वयक असून त्यांनी भाजपला राजकीय पर्याय देण्याचा इशारा दिला होता.  माजी मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘भाभासुमं’शी आणि मातृभाषाप्रेमींशी प्रतारणा केल्याचा आरोपही त्यांनी केला. नुकतेच राज्यात येऊन गेलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भाभासुमंतर्फे काळे झेंडे दाखवण्यात आले. याच वेळी भाजपविरोधी घोषणाही देण्यात आल्या होत्या.  शहा यांना काळे झेंडे दाखवल्‍यामुळे व भाजपविरोधी भूमिका घेतल्‍यामुळे वेलिंगकर यांच्‍यावर कारवाई झाल्‍याचे बोलले जात आहे.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पदावरून हटवण्‍यात आले

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कडेगावमध्ये उपलब्ध

कडेगाव : इको-फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करणे गेल्या काही वर्षापासून आव्हान बनून राहिले आहे. गणेश मंडळे व घरगुती गणेश पूजा

Close