रिलायन्स jio ची ग्राहकांना ‘जी भरके’ ऑफर!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई : सध्या चर्चेत असलेल्या रिलायन्स Jio 4G मुळे भारतात नव्या डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे. 50 रुपयांत1 GB डाटा, संंपूर्ण देशात रोमिंंग फ्री, सणांच्या दिवशी मोफत मेसेजिंंग सेवा तसेच विद्यार्थ्यांंसाठी 25 टक्के अतिरिक्त मोफत डाटा अशी धम्माल वेलकम ऑफर रिलायन्सने आपल्या ग्राहकांंना दिली आहे. मोबाइलची कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट स्लो स्पीडने त्रस्त असलेल्या ग्राहकांना रिलायन्स jio ने ‘जी भरके’ ऑफर दिली आहे, असेच म्हणावे लागेेल. देेशातील 18 हजार शहरांसह 2 लाख गावांमध्ये रिलायन्सने आपली Jio 4G सेवा सुरु केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 42 व्या एजीएममध्ये मुकेश अंंबानींंनी सांगितले की, रिलायन्स Jio सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ व्हिजनला समर्पित केली असून ‘Jio’चा अर्थ ‘Live’ असा आहे. सर्व फ्री सर्व्हिसेस 31 डिसेंबर 2016 पर्यंत लागू राहील. जिओचा डाटा प्लान हा जगातील सर्वात स्वस्त असल्याचा दावा अंबानी यांनी केला आहे.
रिलायन्स Jio लॉन्चिंगनंंतर देशाची ग्लोबल रॅंंकिंगमध्ये सुधारणा होऊन टॉप10 इंटरनेट प्रोव्हाइडरमध्ये भारताचा समावेश होईल, असा विश्वास देखील अबांंनी यांनी व्यक्त केला आहे.

असा मिळवा Reliance Jio 4G सिम
– गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करावं.
– त्यानंतर get jio sim>agree>get jio offer>location>next button>
– ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरला व्हिजिट द्यावी.

रिलायन्स jio ची ग्राहकांना ‘जी भरके’ ऑफर!!!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो !

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह यांनी गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर थँक गॉड बाप्पा हे

Close