डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार करणाऱ्या ‘लिबर्टी’वर कौतुकाचा वर्षाव !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगाव नगरीचा राजा लिबर्टी गणेश मंडळाने अतिशय चांगला आदर्श समाजासमोर ठेवत समाजप्रबोधनाचा गणेशोत्सवातील खरा हेतू सफल केला आहे. या मंडळाला दीर्घ सामाजीक परंपरा आहे. ती जपत यावर्षी या मंडळाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कौतुकास्पद आणि आदर्श निर्णयाबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी लिबर्टी गणेश मंडळाचे प्रमुख उदय देशमुख यांचा सत्कार करून मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या लिबर्टी गणेश मंडळाने समोर ठेवलेला आदर्श इतर मंडळांनीही घ्यावा”, अशा शब्दात त्यांनी लिबर्टीचे कौतुक केलं.

या सत्कारानंतर कडेगाव-पलूस लाईव न्यूजला प्रतिक्रिया देताना लिबर्टी गणेश मंडळाचे प्रमुख उदय देशमुख म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालणे खूप अवघड होते. मात्र डॉल्बीमुळं होणारं ध्वनीप्रदूषण आणि पैशाचा होणारा अपव्ययही लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व गणेशभक्त कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आम्ही हा धाडसी निर्णय घेतला.” यातून वाचलेली रक्कम आम्ही सामाजिक कार्यासाठी वापरणार आहोत, असेही त्यांनी कडेगाव-पलूस लाईव न्यूजला सांगितले.

दरम्यान, या कौतुकास्पद निर्णयाबद्दल लिबर्टी गणेश मंडळाचे प्रमुख उदय देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं परीसरातून कौतुक होत आहे.

 

 

rev-fdi

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार करणाऱ्या ‘लिबर्टी’वर कौतुकाचा वर्षाव !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
देवराष्ट्रेत आज कुस्त्यांचे मैदान

देवराष्ट्रे: दरवर्षी श्रावणात होणारे देवराष्ट्रे येथील कुस्त्यांचे भव्य मैदान ह्यावर्षी आज भरत आहे.  सुमारे १२५ वर्ष जुनी परंपरा असलेले हे

Close