महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात सोमवारी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील विविध गणेश मंडळातर्फे उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला आणि राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी गणरायाची सपत्निक पूजा केली. अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त अजितसिंह नेगी यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

तत्पूर्वी, सोमवारी सकाळी येथील कोपरनिकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरया.. मंगल मूर्ती मोरया… या घोषणा, ढोल ताशांचा गजर व अबीर गुलालाची उधळण… यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३६ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी शांततामय मार्गाने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष करण्यात आला.

(फोटो निदर्शक आहे. सौजन्य:पिक्साबे)

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नऊ माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

माध्यमिक शिक्षकांमध्ये डॉली गेविन हेन्री (वाणी विद्यालय, जे.एन. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई), पांडूरंग रंगराव संकपाल (शाहपूर उच्च विद्यालय, शाहपूर, इचलकरंजी,

Close