अभिनेत्री नम्रता गायकवाड यांची “लिबर्टी” मंडळास भेट0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: कॅम्पस कट्टा फेम अभिनेत्री नम्रता गायकवाड ह्यांनी आज ऐतिहासिक लिबर्टी गणेश मंडळास सदिच्छा भेट देवून कडेगावकरांना गणेशोत्सवामध्ये गोड धक्का दिला.  तरुणाईवर तसेच कौटुंबिक प्रश्नांवर आधारीत मराठी चित्रपट जसे की  कॅम्पस कट्टा (२०१४), वंशवेल (२०१३), सौभाग्य माझं दैवत (२०१२) इत्यादीमुळे अभिनेत्री नम्रता युवा महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत.

img-20160912-wa0020

लिबर्टी गणेश मंडळ नेहमीच नवीन काहीतरी देत आले आहे आणि त्यामुळेच कडेगाव नगरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हे मंडळ लोकप्रिय ठरले आहे. अभिनेत्री गायकवाड ह्यांचे स्वागत “लिबर्टी” चे प्रमुख कार्यवाह श्री. उदय उर्फ तात्यासाहेब देशमुख ह्यांनी केले. भाजपाचे सांगली जिल्ह्यातील प्रमुख युवानेते मा. धनंजय उर्फ भैय्यासाहेब देशमुख ह्यांनी नम्रता गायकवाड ह्यांचा लिबर्टी गणेश मंडळ व कडेगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.

img-20160912-wa0019

img-20160912-wa0018

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

यावर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेऊन तो यशस्वी केल्याचे भैय्यासाहेब देशमुख ह्यांनी सांगितले. लिबर्टीच्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करून नम्रता गायकवाड ह्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी मंडळाचे तरुण कार्यकर्ते व कडेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिनेत्री नम्रता गायकवाड यांची “लिबर्टी” मंडळास भेट

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम आदर्श माता पुरस्कार प्रदान समारंभ १४ सप्टेंबरला

कडेगाव: मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम न्यास, पुणे तर्फे देण्यात येणारा मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम आदर्श माता पुरस्कार प्रदान समारंभ कडेगावमधे

Close