मा.आ.पृथ्वीराज देशमुख यांची भिलवडी गावास भेट0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : भिलवडी येथे माजी आमदार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी भिलवडी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी नुतन ग्रामसचिवालय उभारणीबाबत व गावातील समस्यांचा अनुषंगाने चर्चा झाली. यावेळी पृथ्वीराज बाबांनी जास्तीत जास्त निधी आपल्या गावास देण्याचा प्रयत्न करू, आपल्या गावच्या समस्या वेळोवेळी मांडत जाऊ, असे सांगितले. तसेच भिलवडी पोलिस स्टेशन येथे भेट देवून नूतन पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व स्टाफ यांच्याशी चर्चा केली. यावेळी भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने बाबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेंद्र (भैय्या) वाळवेकर, विजय (आण्णा) चोपडे, उपसरपंच मन्सूर मुल्ला, मा. धनंजय (दाजी) पाटील, चंद्रशेखर केंगार, विजय पाटील, संभाजी महिंद, श्रीकांत निकम, दिपक मगदूम, मनीष कुलकर्णी, तानाजी भोई, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

मा.आ.पृथ्वीराज देशमुख यांची भिलवडी गावास भेट

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
क्रीडापटू ललिता बाबर ह्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन उद्या कडेगावमधे

कडेगाव: क्रीडापटू ललिता बाबर ह्यांचा उद्या कडेगावमधे भव्य नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती भारती विद्यापीठातर्फे देण्यात आली. अलीकडेच संपन्न

Close