क्रीडापटू ललिता बाबर ह्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन उद्या कडेगावमधे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: क्रीडापटू ललिता बाबर ह्यांचा उद्या कडेगावमधे भव्य नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती भारती विद्यापीठातर्फे देण्यात आली. अलीकडेच संपन्न झालेल्या रिओ ऑलिम्पिक मध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने चर्चेत आलेल्या धावपटू ललिता बाबर ह्या माण सारख्या ग्रामीण भागातून आहेत. तरीही कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी जागतिक पातळीवर जे स्थान तयार केले आहे त्यासाठी त्यांचे सार्वत्रिक कौतुक होणे गरजेचे आहे अशी भावना भारती विद्यापीठ व कडेगाव ग्रामस्थांमध्ये व्यक्त  होत आहे.  या अनुषंगाने उद्या दुपारी दोन वाजता भारती विद्यापीठ शैक्षणिक परिसर कडेगाव येथे हा सत्कार सोहळा  आयोजित करण्यात आला आहे.

banner-bf7a2559-a98b-408c-a735-d478eeed49b0

जिल्ह्यातील सर्व तरुण तरुणींनी ललिता बाबर ह्यांचा यशाचा प्रवास त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौ. विजयमाला कदम ह्यांनी केले आहे.  धावपटू ललिता बाबर ह्यांनी ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये दहावे स्थान मिळवले होते.

 

 

 

फोटो सौजन्य: लिविंग मिडीया इंडिया लिमिटेड

 

क्रीडापटू ललिता बाबर ह्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन उद्या कडेगावमधे

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूसच्या “सिद्धिविनायक” मंडळाने राबवले सामाजिक उपक्रम

पलूस: येथील श्री सिद्धिविनायक गणेशोत्वसव मंडळ यांचेतर्फे गणेशोत्सवानिम्मित वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ह्यामध्ये प्रामुख्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक स्वच्छता,

Close