यावर्षीचा ‘वृक्षमित्र  धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार’ कोल्हापुरचे पर्यावरण अभ्यासक गायकवाड यांना0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : सागरेश्वर अभयारण्याचे जनक, ग्रामीण लेखक, पत्रकार, व वृक्षमित्र कै. धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा ‘वृक्षमित्र  धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार’ कोल्हापुरचे पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांना जाहिर झाला आहे. वृक्षमित्र  धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट आणि मराठी साहित्य परिषद कडेगाव, खानापूर यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष आनंदराव पाटील व ट्रस्टचे कार्यवाह सु. धों. मोहिते यांनी दिली. रविवार दि. १८ रोजी सागरेश्वर अभयारण्यात होणा-या ‘आपली शिदोरी…आपले संमेलन’ या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते तर जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.  

 

यावर्षीचा ‘वृक्षमित्र  धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार’ कोल्हापुरचे पर्यावरण अभ्यासक गायकवाड यांना

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘आपली शिदोरी आपले संमेलन’ येत्या १८ तारखेला

देवराष्ट्रे (सदानंद माळी): येथील सागरेश्वर अभयारण्यात रविवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी 'आपली शिदोरी आपले संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. हे

Close