कॉ. पानसरे स्मृतीवृक्ष रोपण १७ ला बलवडीमधे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

बलवडी: येथील क्रांतीस्मृतीवन प्रकल्पामधे येत्या १७ सप्टेंबरला पुरोगामी चळवळीसंबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कॉ. गोविंद पानसरे – स्मृतीवृक्ष रोपण मा. श्री. बी. जी. कोळसे-पाटील ह्यांचे हस्ते तर सुरेश शिंदे-स्मृती प्रवेशद्वार उद्घाटन ज्येष्ठ पुरोगामी अभ्यासक व चित्रलेखा मासिकाचे संपादक श्री ज्ञानेश महाराव ह्यांचे हस्ते होईल. ह्या प्रसंगी “पुरोगामी चळवळ प्रभावी कशी होईल” ह्या विषयावर श्री. महाराव व श्री. कोळसे-पाटील ह्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमास कॉ. मेघा पानसरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे. १७ सप्टेंबर ला दुपारी १ ते ४ ह्या वेळेत हा कार्यक्रम बलवडी (जि. सांगली) येथील प्रसिद्ध क्रांतिस्मृतीवन येथे होणार आहे. ह्या कार्यक्रमाचे संयोजन लोकशासन आंदोलन सांगली जिल्हा, क्रांतिस्मृतीवन, आणि विचारे प्रतिष्ठान ह्यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

कॉ. पानसरे स्मृतीवृक्ष रोपण १७ ला बलवडीमधे

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आदर्श मातांचा सन्मान हा महाराष्ट्राचाच सन्मान : रामराजे नाईक-निंबाळकर

कडेगाव : अत्यंत प्रतिकुल परस्थितीतुन आपल्या कर्तबगार मुलांना घडवणा-या मातांचा सन्मान म्हणजे वैभवशाली महाराष्ट्राचाच सन्मान आहे, असे गौरवोदगार विधान परिषदेचे

Close