पोलीस प्रशासनाच्या हाकेला गणेश मंडळांची सकारात्मक साद0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली : गणेशोत्सव हे समाजप्रबोधन चळवळीचे साधन आहे. यानिमित्ताने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना मांडली. त्याला सकारात्मक प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील गणेश मंडळांनी दिला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १३५ मंडळांनी उत्स्फूर्तपणे डॉल्बीतून वाचलेल्या पैशातून एकूण रुपये ९ लाख १४ हजार २०४ जलयुक्त शिवारास निधी सुपूर्द केला आहे.

डॉल्बीवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेतून गणेशभक्ती करावी व अशा उत्सवामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे उपक्रम राबवावेत, अशी साद श्री. नांगरे पाटील यांनी घातली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तालुका स्तरावर बैठका घेऊन हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवला. या जनप्रबोधनाचे महत्त्व युवकांच्या मनावर बिंबवले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत जिल्ह्यातून १३५ मंडळांनी स्वत: हून एकूण रुपये ९ लाख १४ हजार २०४ जलयुक्त शिवारास निधी सुपूर्द केला आहे.

या उपक्रमास सर्वाधिक प्रतिसाद खानापूर तालुक्यातून मिळाला. विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर व पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. विटा पोलीस ठाणे अंतर्गत १० गणेश मंडळांनी १ लाख २५ हजार रुपये निधी जमा केला. तर दुसऱ्या क्रमांकावर वाळवा तालुक्याने मजल माजली आहे. इस्लामपूर पोलीस ठाणे अंतर्गत केवळ २ गणेश मंडळांनी निधी जमा केला असला तरी ही रक्कम १ लाख १७ हजार रुपये आहे.

जिल्ह्यातील इतर ३ तालुक्यांनी जवळपास प्रत्येकी एक लाख रुपये निधी जमवण्यात यश मिळवले आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत ५ गणेश मंडळांनी १ लाख १० हजार रुपये, शिराळा पोलीस ठाणे अंतर्गत ३५ गणेश मंडळांनी रक्कम ९० हजार रुपये, सांगली पोलीस ठाणे अंतर्गत ७ गणेश मंडळांनी ९० हजार हजार रुपये निधी जमा केला आहे.
मिरज शहर पोलीस ठाणे अंतर्गत २ गणेश मंडळांनी ४३ हजार रुपये, पलूस पोलीस ठाणे अंतर्गत ३ गणेश मंडळांनी ४१ हजार १ रुपये, म. गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत ६ गणेश मंडळांनी ३४ हजार ५०० रुपये, कोकरुड पोलीस ठाणे अंतर्गत ८ गणेश मंडळांनी रक्कम ३४ हजार, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे अंतर्गत ५ गणेश मंडळांनी ३४ हजार रुपये, उमदी पोलीस ठाणे अंतर्गत ३० गणेश मंडळांनी २९ हजार ७०० रुपये, कडेगाव पोलीस ठाणे अंतर्गत २ गणेश मंडळांनी २७ हजार रुपये, कुरळप पोलीस ठाणे अंतर्गत ३ गणेश मंडळांनी २१ हजार रुपये, भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत २ गणेश मंडळांनी २० हजार रुपये, आष्टा पोलीस ठाणे अंतर्गत ३ गणेश मंडळांनी १७ हजार रुपये, आटपाडी पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने १५ हजार रुपये, तासगाव पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने १५ हजार रुपये, जत पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने १५ हजार, कासेगाव पोलीस ठाणे अंतर्गत ३ गणेश मंडळांनी १२ हजार रुपये, विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने १० हजार रुपये, कुंडल पोलीस ठाणे अंतर्गत ४ गणेश मंडळांनी ९ हजार रुपये, सांगली शहर पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने ५ हजार रुपये निधी जमा केला आहे. (सांगली महान्यूज)

पोलीस प्रशासनाच्या हाकेला गणेश मंडळांची सकारात्मक साद

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
यावर्षीचा ‘वृक्षमित्र  धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार’ कोल्हापुरचे पर्यावरण अभ्यासक गायकवाड यांना

कडेगाव : सागरेश्वर अभयारण्याचे जनक, ग्रामीण लेखक, पत्रकार, व वृक्षमित्र कै. धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा 'वृक्षमित्र  धों. म.

Close