राजकारणात घुमताहेत नव्या घरोब्यांचे ‘ढोल ताशे’0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कराड:  शहरात श्रीगणेश विसर्जन मिरवणूकीचा ढोल वाजत असतानाच राजकीय क्षेत्रातील घडामोडींचाही आवाज घुमू लागला. शासकीय विश्रामगृहात आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कृष्णाचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या उपस्थितीत पत्रकारपरिषद आयोजित केली होती. या बैठकीत मोठी घोषणा होणार असल्याचे संकेत आयोजकांनी दिले होते.
कराडच्या नगरपालिका निवडणुकांसाठी चाचपणी सुरू असतानाच राजकारणाची समिकरणे बदलू लागल्याचे दिसले.माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुतणे कराड पंचायत समिती सदस्य अॅड. आनंदराव ऊर्फ राजाभाऊ उंडाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

उंडाळकर कुटूंबाचे दक्षिण मतदारसंघावर नेहमीच प्राबल्य राहिले मात्र गत विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकीय पकड काहीप्रमाणात ढिली होत होती. कृष्णा कारखाना, कराड बाजार समितीतील विजयाने उंडाळर-भोसले गटाचा विजयाचा वारू पुन्हा उधळला…एकूणच प्रत्येक निवडणूक चुरशीची होणार अशी चिन्हे तेव्हापासूनच होती. एका बाजुला उंडाळकर-भोसले गटाचे मैत्री पर्व तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, अविनाश मोहिते यांचे समन्वयाचे राजकारण…यात आज भर पडली ती राजाभाऊ उंडाळकरांची…आता यापुढची राजकीय गणिते निश्चितच महाराष्ट्रात चर्चेची ठरतील…

img-20160915-wa0008

राजकारणात घुमताहेत नव्या घरोब्यांचे ‘ढोल ताशे’

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कॉ. पानसरे स्मृतीवृक्ष रोपण १७ ला बलवडीमधे

बलवडी: येथील क्रांतीस्मृतीवन प्रकल्पामधे येत्या १७ सप्टेंबरला पुरोगामी चळवळीसंबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कॉ. गोविंद पानसरे – स्मृतीवृक्ष

Close