उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थापनाबद्दल कडेगाव पोलीस ठाण्याचे ‘लिबर्टी’ तर्फे आभार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट पद्धतीने सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल कडेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दंडिले ह्यांचा सत्कार येथील ऐतिहासिक ‘लिबर्टी गणेश मंडळ’ व नागरिक यांचेवतीने करण्यात आला. लिबर्टी ग्रुपचे मुख्य कार्यवाह मा. उदयसिंह (तात्यासाहेब) देशमुख तसेच अमर देशमुख व सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा सत्कार केला. कडेगावमधील गणेश विसर्जन मिरवणूक नेहमीच सुरक्षा व्यवस्थेवर ताण आणणारी असते पण पोलीस उपनिरीक्षक श्री. दंडिले साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून यावर्षीची गणेशविसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पाडली अश्या शब्दात मा. उदय देशमुख ह्यांनी कौतुक केले व आभार मानले.  नागरीकामधूनही सुरक्षेविषयी समाधान व्यक्त करण्यात आले.

 new-microsoft-powerpoint-presentation-2

उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थापनाबद्दल कडेगाव पोलीस ठाण्याचे ‘लिबर्टी’ तर्फे आभार

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
राजकारणात घुमताहेत नव्या घरोब्यांचे ‘ढोल ताशे’

कराड:  शहरात श्रीगणेश विसर्जन मिरवणूकीचा ढोल वाजत असतानाच राजकीय क्षेत्रातील घडामोडींचाही आवाज घुमू लागला. शासकीय विश्रामगृहात आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे

Close