जे नालायक, असत्य आहे त्याला अचूक ओळखून धाडसाने बाजूला करा : महाराव0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: समाजामधे ज्या नालायक, असत्य प्रवृत्ती आहेत त्यांना धाडसाने उघडे पाडा. आपआपसात सोवळे करून अश्या अनिस्ष्ट प्रवृत्तींना आपण आजवर मोकळे सोडल्यानेच त्याची किंमत आम्हाला दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारखी लाख मोलाची माणसे गमावून चुकवावी लागली, असे मत चित्रलेखा चे संपादक ज्ञानेश महाराव ह्यांनी व्यक्त केले. बलवडी (ता. खानापूर)  येथील क्रांतीस्मृतीवन इथ सुरेश शिंदे स्मृती प्रवेशद्वार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती वृक्षारोपण मुंबई उच्चन्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते झाले.  यावेळी पुरोगामी चळवळ प्रभावी कशी होईल यावर मार्गदर्शन करण्यात आले.

img_20160917_135508

कोळसे-पाटील म्हणाले समाजाचे तुकडे करायला निघालेल्या प्रवृत्तींना आता पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था या कशाचेही भय उरले नाही. आमची ताकत आता आम्हाला वाढवायला हवी अस कॉम्रेड मेघा पानसरे म्हणाल्या.  कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या तपासकार्यात संबंधित यंत्रणांकडून पुरेसे सहकार्य मिळत नाही त्यामुळे पुरोगामी विचाराच्या सर्व छोट्या संघटनांनी एकत्र येवून या  विरोधात जाब विचारायला हवा.

 

header-add

 

 

जे नालायक, असत्य आहे त्याला अचूक ओळखून धाडसाने बाजूला करा : महाराव

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थापनाबद्दल कडेगाव पोलीस ठाण्याचे ‘लिबर्टी’ तर्फे आभार

कडेगाव: गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट पद्धतीने सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल कडेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दंडिले ह्यांचा सत्कार येथील ऐतिहासिक 'लिबर्टी गणेश मंडळ' व

Close