कायदेशीर त्रुटी दूर करून सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा : डॉ. पतंगराव कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी आघाडीच्या काळात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सत्ता परिवर्तन व कायदेशीर त्रुटी यामध्ये तत्कालीन शासनाचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत अडकला. त्यामधील त्रुटी दूर करून शासनाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा.  राज्यात लाखोंच्या संख्येने निघत असलेले मराठा समाजाच्या मराठा क्रांती मूक मोर्चात मराठा बांधव स्वयंप्ररेणेने सहभागी होत आहेत. या अभूतपूर्व व ऐतहासिक मोर्चाची राज्य शासनाने गंभीर दखल घेवून मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांनी केली. कडेगाव येथे पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

माजी मंत्री डॉ. कदम म्हणाले, मराठा समाज अत्यंत शिस्त, संयम आणि शांततेच्या मार्गाने संघटीत झाला आहे. २७ सप्टेंबर रोजी सांगली येथे होणार्‍या मराठा क्रांती मोर्चासाठी राजकारण विरहीत सहभाग घेवून सर्वतोपरी मदत व सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजाच्या मोर्चात सर्वपक्षीय बांधव एकत्रित येत आहेत. त्यामध्ये कसलीही आतषबाजी, घोषणाबाजी किंवा नेतेगिरी होणार नाही. मराठा समाजातील नेत्यांनी या मोर्चात सामील होताना नेता म्हणून न होता मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सांगलीत होत असलेल्या मोर्चाच्या तयारीसाठी सर्व तालुक्यातून नियोजन बैठका सुरू आहेत. या मोर्चासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मराठा समाजाने सर्वांना बरोबर घेवून एकदिलाने चालण्याची भूमिका ठेवली आहे. मराठ्यांचा हा मोर्चा कोणत्याही जाती धर्माच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून तो मराठ्यांच्या न्याय मागण्यांच्या व हक्कासाठी आहे, असे मोर्चकर्‍यांनी स्पष्ठ केले आहे. लिंगायत, जैन व इतर काही समाजांनी मराठा क्रांती मूक मोर्चास पाठिंबा दिला आहे. हे मोर्चे अतिशय शिस्तबध्द व शांततेत सुरू आहेत. हीच परंपरा सांगलीच्या विराट मोर्चात देखील दिसेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

फोटो सौजन्य: तरुण  भारत

 

untitled-3

कायदेशीर त्रुटी दूर करून सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा : डॉ. पतंगराव कदम

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सागरेश्वर अभयारण्य प्रवेशद्वाराला ‘वृक्षमित्र धों.म.’यांचे नाव : पृथ्वीराज देशमुख

कडेगाव (सदानंद माळी) : सागरेश्वर अभयारण्यासाठी धों.म. मोहिते अण्णांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे अभयारण्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यासंदर्भात मुख्यमंत्री,

Close