संघटीत लोकसहभागातून कडेगावला नवं रूप देणार: मुख्याधिकारी चरण कोल्हे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, आणि युवावर्गाच्या संघटीत सहकार्यातून ऐतिहासिक कडेगावला नवं रूप देणार असल्याचा निर्धार कडेगाव नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी चरण सहदेव कोल्हे यांनी ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ शी बोलताना व्यक्त केला.

ते म्हणाले, ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमधे रुपांतर होताना अनेक अडचणी समोर असतात. विकासकामांसाठी उत्पन्न वाढवनं, मुलभूत नागरी सुविधांसाठी निधी उभा करणे याबरोबरच प्रशिक्षित कर्मचारी आणि तज्ञ स्टाफ यांची गरज असते.  ही समस्या येथेही आहे व त्यादृष्टीने माझा प्रयत्न राहील. स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, आणि स्ट्रीट लाईटस यांना प्राधान्य देण्याचे निश्चित केले आहे. या आव्हानांचा मुकाबला करताना एक बाब सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे की ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो त्यामुळे कडेगावला नवं रूप देण्यासाठी आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, आणि युवावर्गाच्या संघटीत सहकार्याची गरज आहे. हे सहकार्य मला निश्चित मिळेल आणि लवकरच प्रगतीशील आणि विकासाभिमुख कडेगावचं चित्र आपणा सर्वाना पहायला मिळेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.

संघटीत लोकसहभागातून कडेगावला नवं रूप देणार: मुख्याधिकारी चरण कोल्हे

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कायदेशीर त्रुटी दूर करून सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा : डॉ. पतंगराव कदम

कडेगाव : मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी आघाडीच्या काळात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सत्ता परिवर्तन व

Close