मराठा समाजाचा सांगलीत एल्गार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली : मराठा आरक्षण आणि कोपर्डी घटनेच्या निषेधासाठी निघालेला मराठा क्रांती मोर्चाचा झंझावात आज सांगलीत पोहोचला. लाखोंच्या संख्येनं मराठा समाजबांधवानी सांगलीत शक्तीप्रदर्शन केलं. दरम्यान, आंदोलकांच्यावतीनं जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
आज पहाटेपासूनच सांगलीत आंदोलनकर्ते यायला सुरूवात झाली. वाहतुक कोंडी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून प्रशासनांन जय्यत तयारी केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३७४ शाळा, कॉलेजना सुटटी देण्यात आली आहे. पाच हजार स्वयंसेवक आणि ३० रूग्णवाहीका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. व्हिडीओ चित्रीकरणासाठी पाच ड्रोन कॅमेरे तैनात आहेत. चारशे फिरती शौचालये, महाडीक समुहाकडुन २ लाख पाणी बाटल्या, मुस्लिम समाजाकडुन पाच लाख पाण्याची पाकीटे, कॉलेज कॉर्नरला सावकार गणेशोत्सव मंडळातर्फे अन्नदान, अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

img-20160927-wa0012

img-20160927-wa0016

मराठा समाजाचा सांगलीत एल्गार

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमधे कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

कडेगाव: इथल्या महात्मा गांधी विद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून वाजत गाजत

Close