सांगलीच्या मराठा क्रांती मोर्च्यात हिंदू- मुस्लीम ऐक्याचं दर्शन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी) : सांगली इथं कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मूक मोर्चा शांततेत पार पडला. लाखोच्या संख्येने मराठ्यांचा जनसागर उसळला. जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर राम मंदीर चौकात मोर्चाचा समारोप झाला.

दक्षिण महाराष्ट्रातील हा पहिलाच मोर्चा असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मोर्चात जिल्ह्यातील महिला-पुरुष, तरुण-तरुणी, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, तसेच विद्यार्थ्यांनी लाखोंच्या संख्यने मोर्चात सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचे संयोजकांनी सांगितले.
या मोर्चाचे वैशिष्ट्ये म्हणजे, यात हिंदु-मुस्लिम ऐक्य ‍दिसून आले. मुस्लिम बांधव मोर्चेकर्‍यांना पाणी पाऊच वाटप करत होते. शहरात ठिकठिकाणी मुस्लिम समाजातर्फे पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. विश्रामबाग चौक, कॉलेज कॉर्नर, शंभर फुटी, कारखाना परिसरात दहा ठिकाणी स्टॉल लावले होते.
दरम्यान, तासगाव तालुक्यातील वायफळे येथून सांगली येथे मराठा मोर्चाला जाणार्‍या इनोव्हा गाडीला सकाळी भीषण अपघात झाला. यात दोन ठार झाले असून तीन जखमी झाले आहेत. धनाजी पाटील व भास्कर पाटील अशी मृतांची नावे आहेत. गौरगावजवळ ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात झाला.

img-20160927-wa0038

मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी १८०० पोलिस कर्मचारी, ७५० होमगार्ड, एसआरपीएफच्या ४ तुकड्या, ९ विभागीय पोलिस अधिकारी, ५ पोलिस उपअधीक्षक, असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात करण्यात आला होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातली वाहतूक सकाळी ६ पासूनच बंद करण्यात आली होती. मोर्चासाठी हजारो महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आले होते. सीमेवरील कर्नाटकच्या गावांमधून तसेच कोल्हापूरमधील मोर्चेकरी सांगलीत दाखल झाले होते.

आजच्या मोर्चात राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर.पाटील अर्थात आबांचे कुटुंबिय मोर्चात सहभागी झाले होते. तसेच माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, विश्वजित कदम, जयंत पाटील, खासदार संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार सहभागी झाले होते.

सांगलीच्या मराठा क्रांती मोर्च्यात हिंदू- मुस्लीम ऐक्याचं दर्शन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मराठा समाजाचा सांगलीत एल्गार

सांगली : मराठा आरक्षण आणि कोपर्डी घटनेच्या निषेधासाठी निघालेला मराठा क्रांती मोर्चाचा झंझावात आज सांगलीत पोहोचला. लाखोंच्या संख्येनं मराठा समाजबांधवानी

Close