पृथ्वीराज बाबांनी घेतला धस्के यांच्या चटकदार भेळचा आस्वाद0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी) : उत्कृष्ठ चवीच्या चहासाठी गेल्या शंभर वर्षांपासून पंचक्रोशीत प्रसिध्द असणाऱ्या आणि परिसरातल्या खवय्याना चटकदार भेळची खुसखुशीत मेजवानी देणाऱ्या श्री. धस्के बंधू यांच्या कडेगाव येथील प्रसिद्ध सुदर्शन हॉटेलला भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरात प्रसिद्ध असणाऱ्या चटकदार भेळचा नागरिकांसोबत आस्वाद घेतला.

श्री. धस्के बंधू यांच्या हॉटेल सुदर्शनचे मालक चंद्रकांत धस्के यांनी त्यांचे स्वागत केले. समवेत त्यांचे बंधू सूर्यकांत धस्के आणि कुटुंबिय उपस्थित होते. बाबांनी भेळच्या अतिशय उत्कृष्ठ चवीबद्दल कौतुक केले. ‘मी कामानिमित्त अनेक ठिकाणी फिरतो. अनेक पदार्थांची चव घेतो. मात्र इतक्या खमंग आणि चटकदार चवीची भेळ प्रथमच पाहतोय. ही चव देशात आणि परदेशात जाण्याची गरज आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करू, अशा शब्दात त्यांनी श्री. धस्के बंधू यांना शुभेच्छा दिल्या.

img-20161001-wa0015

लवकरच ही भेळ पॅकिंग स्वरुपात उपलब्ध होणार असून राज्याच्या सर्व निवडक शहरात उपलब्ध करुन् दिली जाईल, अशी माहिती धस्के’ज ग्रुप चे युवा उद्योजक दयानंद धस्के यांनी दिली. हॉटेलला भेट दिल्याबद्दल चंद्रकांत धस्के यांनी बाबांचे आभार मानले.

पृथ्वीराज बाबांनी घेतला धस्के यांच्या चटकदार भेळचा आस्वाद

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतिनिमित्त स्वच्छता मोहीमचे आयोजन

कडेगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतिनिमित्त कडेगाव नगरपंचायतीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती साजरी केल्यानंतर प्रमुख मान्यवर

Close