कडेगावमध्ये स्वच्छता मोहिम व लोकजागृतीच्या माध्यमातून गांधी जयंती साजरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सुहास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रदीप कोळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी स्वागत व मुख्य मार्गदर्शन केले. यावेळी पाहुण्यांनी महात्मा गांधी आणि त्यांची अहिंसा चळवळ याबाबत विचारमंथन केले. मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी हागणदारी मुक्त नगर योजनेबाबत माहिती दिली. त्यानंतर नगरपंचायत आणि विद्यानगर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात नागरीक तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

img_0045

मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी स्वच्छ भारत मिशन च्या अंतर्गत हागणदारी मुक्त शहर, घनकचरा व्यवस्थापन, व इतर नियोजनाची माहिती नागरिकांना दिली व उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले. सर्वांगीण स्वच्छतेसाठी उपलब्ध योजनांचा नागरिकांनी फायदा घेऊन शक्य तितक्या वेगात उद्देश पूर्ण करावा असे आवाहन त्यांनी केले. आजच्या गांधी जयंती कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर परिसरातील युवक-युवती यांचा समावेश होता व त्यांनी उत्स्फुर्तपणे श्रमदानामध्ये भाग घेतला.

img_5758

कडेगावमध्ये स्वच्छता मोहिम व लोकजागृतीच्या माध्यमातून गांधी जयंती साजरी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पृथ्वीराज बाबांनी घेतला धस्के यांच्या चटकदार भेळचा आस्वाद

कडेगाव (सदानंद माळी) : उत्कृष्ठ चवीच्या चहासाठी गेल्या शंभर वर्षांपासून पंचक्रोशीत प्रसिध्द असणाऱ्या आणि परिसरातल्या खवय्याना चटकदार भेळची खुसखुशीत मेजवानी

Close