गदिमा काव्यसंमेलन संपन्न0 मिनिटे
कडेगाव (सदानंद माळी): कडेगाव खानापूर मराठी साहित्य परिषद व भारतमाता ज्ञानपीठ विटा यांचे संयुक्त विद्यमाने गदिमा काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश जाधव होते.
कडेगाव व खानापूर परिसरातील अनेक नामवंत कवींनी या काव्यसंमेलनात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. गदिमांच्या अनेक कविता वेगवेगळ्या शैलीमधे सदर करून साहित्याला उजाळा देण्यात आला.
या काव्यसंमेलनास प्रसिद्ध अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, आणि सुभाष पाटील ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.