0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

भूमितीमधे एका बिंदूच अस्तित्व त्याची त्रिज्या आणि त्या त्रिज्येतून तयार होणाऱ्या परिघातून निर्माण होते. या अस्तित्वाचे रूपक जर कोणत्याही व्यक्तीस लागू करायचे झाले तर ढोबळ मानाने असे सांगता येईल की  कोणताही व्यक्ती (बिंदू) त्याच्या विशिष्ट त्रिज्येतून (वैचारीक व मूल्यात्मक विकास) स्वतःचा परीघ म्हणजे सामाजिक अस्तित्व तयार करत असतो. इथे प्रश्न हा उद्भवतो की व्यक्ती स्वतःचे अस्तित्व सामाजिक परीव्यवस्थेतून तयार करतो की स्वतःच्या उपजत जाणीवेतून स्वतःचे सामाजिक अस्तित्व तयार करत असतो.अश्या खोल शंकांचं उत्तर या प्रकारे देता येईल. व्यक्ती  आणि समाज एका विशिष्ट अन्योन प्रक्रियेतून एकमेकांचे अस्तित्व तयार करत असतात. इथ व्यक्ती जितकी सामाजिक असते तितकाच व्यक्तींचा समाजही त्या विशिष्ठ व्यक्तीसमुहांच्या मूल्यांशी निष्ठा राखणारा असतो. मग, इथे ‘स्वत्व’ सारख्या मूलतः व्यक्तीनिष्ठ समजल्या जाणाऱ्या संकल्पनांना कोणते स्थान आहे ? (क्रमशः)

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
गदिमा काव्यसंमेलन संपन्न

कडेगाव (सदानंद माळी): कडेगाव खानापूर मराठी साहित्य परिषद व भारतमाता ज्ञानपीठ विटा यांचे संयुक्त विद्यमाने गदिमा काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले

Close