कडेगावचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी, इच्छुकांचे मनसुबे धुळीस0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : सुमारे तीन दशकाहून अधिकच्या राजकीय संघर्षाने राज्याचे लक्ष वेधलेल्या कडेगावला आत नगरपंचायत झालीय. या नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान इतर मागास प्रवर्गातील महिलेला मिळणार आहे. त्यामुळे गुडघ्याला बशिग बांधून तयार असलेल्या अनेक इच्छुकांची निराशा झाली आहे. 

     कडेगावमध्ये माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम आणि माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष आहे. कडेगाव ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यात गेले काही वर्ष कदम गटाला यश मिळाले होते. कडेगाव आणि पलूस हा स्वतंत्र तालुकाही कदम यांच्या प्रयत्नानेच झाला. सध्या या ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली आहे. तेव्हापासून अनेक इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे होते. मात्र हे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी आज जाहीर केले. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.
      या पदासाठी आता फारसा कुणाला रस नसला तरी सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती राहाव्या, यासाठी दोन्ही गट जोरदार प्रयत्न करतील. सध्यातरी नगराध्यक्षपदासाठी दोन्ही गटाकडून कोणत्या महिलांना संधी दिली जातेय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

कडेगावचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी, इच्छुकांचे मनसुबे धुळीस

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव पंचायत समिती निवडणूकीमध्ये असणार महिलांचा स्वागतार्ह सहभाग

कडेगाव: पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले आहे. नव्या आरक्षणानुसार वांगी गट अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवला आहे. चिंचणी गट

Close