मराठा आरक्षणासंदर्भातील हालचालींना ‘वर्षा’वर वेग0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर यासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत न्यायालयीन लढ्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भात १३ तारखेला हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली.

सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीला भाजप नेते विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. याशिवाय आरक्षण समितीचे सदस्यही हजर होते.

मराठा आरक्षणासंदर्भातील हालचालींना ‘वर्षा’वर वेग

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी, इच्छुकांचे मनसुबे धुळीस

कडेगाव : सुमारे तीन दशकाहून अधिकच्या राजकीय संघर्षाने राज्याचे लक्ष वेधलेल्या कडेगावला आत नगरपंचायत झालीय. या नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान

Close