कडेपूर येथे रक्तदान शिबिरामध्ये तरुणांचा कौतुकास्पद सहभाग0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेपूर: येथील आर्टस व कॉमर्स कॉलेज व पद्मभूषण वसंतदादा पाटील रक्तपेढी यांचे संयुक्त माध्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास आज तरुणांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून प्रतिसाद दिला.  विद्यार्थी व प्राध्यापक मंडळी यांनी संयुक्तपणे यात सहभाग घेतला व तब्बल ३२ जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.

img-20161007-wa0018

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शहाजी पाटील यांचे हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. ‘तरुणांनी सामाजिक आरोग्य व्यवस्थेमध्ये जबाबदार भूमिकेने वागणे आवश्यक आहे’ असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना सांगितले.  हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी  प्रा. एस . वाय. पाटील व प्राध्यापक ए. एच. बोगुलवार यांनी विशेष प्रयत्न केले. या रक्तदान शिबिरामध्ये अनेक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला.

 

img-20161007-wa0021

कडेपूर येथे रक्तदान शिबिरामध्ये तरुणांचा कौतुकास्पद सहभाग

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
फ्लिपकार्ट ची एका दिवसात १४०० कोटींची विक्रमी उलाढाल

नवी दिल्लीः 'फ्लिपकार्ट' ने एका दिवसात विक्रमी कमाई नोंदवली आहे. फ्लिपकार्टवर सोमवारी तब्बल १४०० कोटींचा व्यवहार करण्यात आला. भारतात एका दिवसात

Close