अक्युप्रेशर व नैसर्गिक राहणीमानातून आरोग्यप्राप्ती सुलभ: डॉ. नितीन जाधव0 मिनिटे
कडेगाव: येथील आझाद नवरात्र उत्सव मंडळ व धस्के’ज सात्विक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई येथील प्रसिद्ध आरोग्य तज्ञ डॉ. नितीन जाधव यांच्या व्याख्यानास परिसरातील नागरिकांनी भरगोस प्रतीसाद दिला. तब्बल एक तास चाललेल्या या व्याख्यानामध्ये डॉ. जाधव यांनी वेगवेगळ्या आजारांच्या मागे असलेली चुकीची धारणा व जीवनशैली मधील घटकांचा नकारात्मक परिणाम याविषयी विस्तृत विचार मांडले.
व्याख्यानाचे प्रास्ताविक कडेगावचे संशोधक श्री. गजानन धस्के यांनी केले. डॉ. जाधव व त्यांचे सहकारी डॉ. समीर आनंदराव यांनी अक्यूप्रेशर चिकित्सा व त्याचा पारंपारिक जीवनशैलीमध्ये असणारा अंतर्भाव स्पष्ट करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. व्याख्यानानंतर डॉ. जाधव यांनी परिसरातील नागरिकांशी त्यांच्या आरोग्य तक्रारीसंबंधी मार्गदर्शन केले.