या आईमामु धुल्ला!!! कडेगावला गगनचुंबी ताबुतांच्या रोमहर्षक भेटी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असणाऱ्या आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला कडेगावचा जगप्रसिद्ध मोहरम हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज पार पडला. राज्यातील प्रमुख नेत्यांनी या उत्सवाला भेट दिली. यात माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या जगप्रसिद्ध सोहळ्यात गगनचुंबी तांबुतांच्या भेटी होतात.

हा रोमहर्षक क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित असतात. या मोहरमच्या निमित्तानं गुरूवारी भव्य कुस्त्यांचे मैदान होणार आहे. मल्ल व कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय.

या आईमामु धुल्ला!!! कडेगावला गगनचुंबी ताबुतांच्या रोमहर्षक भेटी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डॉ. सगरे यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराचे आयोजन येत्या १२ तारखेस

कडेगाव (सदानंद माळी): ग्रामपंचायत तोंडोली व जय श्री अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट, तसेच तोंडोली ग्रामस्थ यांचेवतीने येत्या १२ तारखेस प्रख्यात

Close