युवानेते उदय देशमुख यांचा वाढदिवस दिमाखात साजरा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): कडेगावमधील लिबर्टी ग्रुप च्या माध्यमातून सक्रीय समाजकारण व राजकारणामध्ये नव्याने समाविष्ट झालेलं नेतृत्व म्हणजेच उदय उर्फ तात्यासाहेब देशमुख. काल १२ ऑक्टोबर रोजी उदय यांचा वाढदिवस युवा कार्यकर्ते व नेते यांच्या  उपस्थितीत साजरा करण्यात आला.  वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम संध्याकाळी लिबर्टी ग्रुप च्या कार्यकर्त्यांच्या व निमंत्रित ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.

दुपारी साजऱ्या झालेल्या सत्कार कार्यक्रमात माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी मा. उदय देशमुख यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले. अनेक कार्यकर्त्यांनी गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत शुभेच्छाचे फ्लेक्स बोर्ड लावून युवाशक्ती चे प्रदर्शन केले. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य प्रमाणत साजरा झालेल्या मा. उदय देशमुख यांच्या वाढदिवस कार्यक्रमामुळे कडेगाव परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

vlcsnap-error103

युवानेते उदय देशमुख यांचा वाढदिवस दिमाखात साजरा

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
या आईमामु धुल्ला!!! कडेगावला गगनचुंबी ताबुतांच्या रोमहर्षक भेटी

कडेगाव : सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असणाऱ्या आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला कडेगावचा जगप्रसिद्ध मोहरम हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज

Close