उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची जपान येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची जपान येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

राज्य नागरी विकास संस्थेअंतर्गत प्रगत पदव्युत्तर नागरी व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमांतर्गत येत्या २० ते २८ ऑक्टोबर दरम्यान हा अभ्यास दौरा पार पडणार आहे.  या अभ्यास दौऱ्याअंतर्गत विशेष निवड झालेल्या व नागरी प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा अभ्यासगट इतर देशातील नागरी व्यवस्थांचा अभ्यास करून भारतातील नागरी व्यवस्थापन जागतिक दर्जाचे कसे करता येईल याविषयी खोलात जाऊन अभ्यास करेल.

मा. लेंगरेकर यांनी उल्हासनगर महापालिकेत रुजू झाल्यापासून नवनवीन उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अतिक्रमणविरोधी धडक मोहीम व पालिका शाळांमधला शैक्षणिक दर्जा पुढे नेण्यासाठी घेतलेले नवनवीन प्रशिक्षण कार्यक्रम व उपक्रम यामुळे ते आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जातात.  मा. जमीर लेंगरेकर या दौऱ्याच्या माध्यमातून झालेल्या अभ्यासातून कोणत्या नवीन योजना सुरु करणार याविषयी उल्हासनगर प्रशासकीय कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये उत्सुकता आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची जपान येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मोहरम निम्मित भरलेल्या कडेगावच्या कुस्तीमैदानात महाराष्ट्रातील मल्लांचे अप्रतिम प्रदर्शन

कडेगाव : मोहरम निम्मित भरलेल्या वार्षिक कुस्तीमैदानामध्ये महाराष्ट्रभरातील गाजलेल्या मल्लांनी आज रोमहर्षक कुस्ती प्रदर्शनाने प्रेक्षकांना अस्सल मराठी मातीचा 'टच' कसा

Close