मोहरम निम्मित भरलेल्या कडेगावच्या कुस्तीमैदानात महाराष्ट्रातील मल्लांचे अप्रतिम प्रदर्शन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : मोहरम निम्मित भरलेल्या वार्षिक कुस्तीमैदानामध्ये महाराष्ट्रभरातील गाजलेल्या मल्लांनी आज रोमहर्षक कुस्ती प्रदर्शनाने प्रेक्षकांना अस्सल मराठी मातीचा ‘टच’ कसा असतो त्याचे सर्वांगसुंदर प्रात्यक्षिक दाखवले.

दरवर्षी बाबा पटेल चौकातील कुस्तीमैदानांत भव्य बक्षिसाच्या कुस्त्या ताबूत भेटींच्या दुसऱ्या दिवशी भरतात. महाराष्ट्रभरातून अत्यंत नामवंत मल्ल आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी येतात, त्यापद्धतीने यावर्षीही अनेक कुस्तीगीर दूरच्या ठिकाणाहून कडेगावमध्ये दाखल झाले होते.

vlcsnap-error470

वेगवेगळ्या वयोगटातील तीसपेक्षा जास्त कुस्त्या या मैदानात झाल्या. मुख्य आकर्षण ठरलेल्या शेवटच्या तीन कुस्त्या दहा वाजेपर्यंत सुरु होत्या.

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती साईनाथ रामुगडे व मारुती जाधव या प्रसिद्ध मल्लांच्यामध्ये झाली व ती बरोबरीत सुटली.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये विजय चौधरी ह्या मल्लाने घुटना डावावर विजय मिळवला.

 

vlcsnap-error966

पहिल्या क्रमाकांची कुस्ती पै. रोहित पटेल व  पै. मनजित सिंग यांच्यामधे झाली. या प्रेक्षणीय कुस्तीसाठी पंच म्हणून हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ होते. या कुस्तीमध्ये रोहित पटेल या मल्लाने घुटना डावावर मनजित ला चीत केले.

तब्बल पाच तास चाललेल्या या कुस्तीमैदानात हजारो प्रेक्षक शेवटपर्यंत उपस्थित होते. या प्रख्यात मैदानामध्ये आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी भागातील मान्यवर नेतेमंडळी, कुस्तीचे जाणकार, व कुस्तीवर प्रेम करणारे अस्सल मराठी प्रेक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

img_20161013_171255

 

मोहरम निम्मित भरलेल्या कडेगावच्या कुस्तीमैदानात महाराष्ट्रातील मल्लांचे अप्रतिम प्रदर्शन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
युवानेते उदय देशमुख यांचा वाढदिवस दिमाखात साजरा

कडेगाव (सदानंद माळी): कडेगावमधील लिबर्टी ग्रुप च्या माध्यमातून सक्रीय समाजकारण व राजकारणामध्ये नव्याने समाविष्ट झालेलं नेतृत्व म्हणजेच उदय उर्फ तात्यासाहेब

Close