कोल्हापुरात मराठा समाजाचा रेकॉर्डब्रेक मोर्चा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोल्हापूर : अपेक्षेप्रमाणे राजर्षि शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा असलेल्या कोल्हापूरात मराठा समाजाचे विराट मूकमोर्चातील गर्दीने विक्रम मोडीत काढले. या मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. सकाळी सातपासूनच शहराच्या विविध ठिकाणांहून नागरिक जमा होत होते. मोर्चात कोपर्डी घटनेतील नराधमांना कठोर शिक्षा द्या. मराठा समाजाला आरक्षण द्या, अशा विविध मागण्यांचा एकमुखी सूर होता. गांधी मैदानावरून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली.

गांधी मैदान, सायबर चौक, कसबा बावडा, ताराराणी चौकातून लाखोंचे जथ्थे दसरा चौकातून पुढे निघत होते. त्यानंतर  जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

img-20161016-wa0000

एक मराठा लाख मराठाघातलेल्या टोप्या, भगवे झेंडे घेऊन मोर्चेकरी सामील झाले आहेत. तसेच सातारा, सांगली तसेच कोकणातून नागरीक कोल्हापूरातील मोर्चात सहभागी झाले होते. महाराष्ट्र- कर्नाटकाच्या सीमाभागातूनही हजारो लोक मोर्चात सहमागी झाले . ड्रोनच्या अंदाजानुसार सुमारे ५३ लाख लोक मोर्च्यात सहभागी झाले असण्याची शक्यता आहे.
खासदार छत्रपती संभाजी राजे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, यांची मोर्चात उपस्थिती होती.

काही खाजगी हॉस्पिटल्सनी मोर्चेकरी लोकांसाठी वैद्यकीय पथक उपलब्ध केले होते.

img-20161015-wa0006

 

कोल्हापुरात मराठा समाजाचा रेकॉर्डब्रेक मोर्चा

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची जपान येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड

कडेगाव: उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची जपान येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. राज्य नागरी विकास संस्थेअंतर्गत प्रगत पदव्युत्तर

Close