कडेगाव नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई : राज्यातील एकूण १९२ नगरपरिषदा व २० नगरपंचायतींच्या (एकूण २१२) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत २७ नोव्हेंबर, १४ व १८ डिसेंबर २०१६ आणि ८ जानेवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर यातील १९२ नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठीदेखील संबंधित दिवशी मतदान होईल आणि मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, यात मुदत संपणाऱ्या १९०नगरपरिषदा व ४ नगरपंचायती; तर  नवनिर्मित २ नगरपरिषदा व १६ नगरपंचायतींचा समावेश आहे. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणीची आचारसंहिता संपुष्टात येईल.

नवनिर्मित कडेगाव नगरपंचायत निवडणूक येत्या २७ नोवेंबर ला होईल. थेट नगराध्यक्ष निवडीसाठीचे मतदानही त्याचवेळी होईल. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मतमोजणी होणार आहे. कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी वरील निवडणूक वेळापत्रकाचे अनुमोदन केले आहे.

कडेगाव नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कोल्हापुरात मराठा समाजाचा रेकॉर्डब्रेक मोर्चा

कोल्हापूर : अपेक्षेप्रमाणे राजर्षि शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा असलेल्या कोल्हापूरात मराठा समाजाचे विराट मूकमोर्चातील गर्दीने विक्रम मोडीत काढले.

Close