परंपरेची ओळख देणारा कौतुकास्पद उपक्रम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

हसत्या खेळत्या घराचं मानसिक आरोग्य नष्ट करणारे मोबाईल्स,त्यावरील थरारक गेम्स,टिव्हीवरील हॉरर फिल्स यापेक्षा किल्ला या विषयाकड मुलांना परत घेवून जाणारी मैत्र प्रतिष्ठानची किल्ला स्पर्धा कडेगावसारख्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. मैत्र प्रतिष्ठानला याबाबत धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच.

खरं तर आज ही सर्वांत मोठी समाजाची गरज आहे. दहा-वीस वर्षांपूर्वी मुलांच्या आवडी-निवडी वेगळया होत्या. त्यांच्या तोंडी गाणी वेगळी होती. त्यांना ऐकवल्या जाणा-या कथा वेगळया होत्या. या मुलांची भाषाही वेगळी होती. पण अलिकडच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अशी काय क्रांती आणली की समाजाचं चित्रच बदललं. नको ते आजार वाढले. मुलांच्या भवितव्याची नको इतकी चिंता पालकांना वाटायला लागली. तसा हा स्वतंत्र आणि तितकाच गंभीर विषय आहे. अलिकडेच उदभवलेल्या अशा  काही समस्यांवर समाजानं एकत्रित येवून विधायक उपक्रम नव्या पिढीत रूजवण्याची गरज आहे. त्याचाच प्रारंभ ‘मैत्र’नं केलाय. 

किल्ला स्पर्धा ही साधी स्पर्धा वाटत असली तरी त्यातुन बरीच सामाजिक मुल्ये आणि जगण्याची मुल्ये नव्या पिढीत रूजवता येतात. एकुणच किल्ले,त्यांची पार्श्वभूमीवर आणि यासंदर्भातली सध्याची नव्या पिढीची कर्तव्ये काय आहेत,याची जाणीवजागृती यामाध्यमातुन होणार आहे. हे फार मोठं काम ‘मैत्र’ करत आहे. त्याबददल ‘मैत्र’च्या सर्व सहका-यांच कौतुक करावं तितकं थोडंच. 

याच्याही पुढं जावून आणखी एक चांगला उपक्रम या संघटनेनं करावा. कोणत्याही किल्ल्यावर गेल्यानंतर तिथं आपली वर्तणूक कशी असावी, किल्ला कसा समजुन घ्यावा, किल्ल्याची निगा कशी राखावी, किल्ल्याचा खरा इतिहास काय, हे नव्या पिढीला समजुन देण्यासाठी सहभागी मुलांची एक छोटी सहल नजीकच्या किल्ल्यावर न्यावी. तिथं जाणकार आणि अभ्यासुंच्या सोबत त्यांना किल्ला समजुन घेण्यासाठी हा दिवस द्यावा. यामुळं किल्ला स्पर्धेचा खरा हेतू साध्य होईल. 


छाया: उद्धव ठाकरे यांच्या पुस्तकातून साभार

 

परंपरेची ओळख देणारा कौतुकास्पद उपक्रम

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले

कडेगाव: अतिशय उत्सुकतेने वाट पहिल्या जाणाऱ्या मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले गेले आहे.  कडेगाव परिसरातील बाल-गोपालामधे प्रसिद्ध असणारी

Close