मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: अतिशय उत्सुकतेने वाट पहिल्या जाणाऱ्या मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले गेले आहे.  कडेगाव परिसरातील बाल-गोपालामधे प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा यावर्षीही नावाप्रमाणेच भव्य असणार आहे.

स्पर्धेसाठीचे पहिले पारितोषिक ३३३३ रुपये आहे. तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे २२२२ रुपये व ११११ रुपये आहे. चौथ्या क्रमांकासाठी ७७७ रुपये तर पाचव्या क्रमांकासाठी ५५५ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

वरील मुख्य बक्षिसांबरोबरच कै. बाबुराव गोविंद डांगे यांचे स्मरणार्थ उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच विजेत्या स्पर्धकांना मा. जमीर लेंगरेकर (उपायुक्त, उल्हासनगर महानगरपालिका) यांचेतर्फे पुस्तक संच भेट दिला जाणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित असून १०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.

स्पर्धेसाठीची किल्ला पाहणी २ व ३ नोव्हेंबर रोजी होणार असून पारितोषिक वितरण ५ नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे.

छाया:श्री. म्हात्रे

 

मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला

मुंबई : राज्यातील एकूण १९२ नगरपरिषदा व २० नगरपंचायतींच्या (एकूण २१२) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत २७ नोव्हेंबर, १४ व १८ डिसेंबर

Close