पद्मश्री लक्ष्मण माने यांची महिला अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सातारा: जेष्ठ विचारवंत, माजी आमदार “उपरा” कार पद्मश्री लक्ष्मण माने यांची आज सातारा न्यायालयाने सर्व सहा महिला अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. 

अखंड महाराष्ट्रातील विचारवंतांचे अन चळवळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेल्या या महिला अत्याचार  खटला प्रकरणी अखेर आज सातारा न्यायालयाने निकाल जाहीर केला. लक्ष्मण माने यांना निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचा निकाल न्यायमूर्ती  वर्षा  मोहिते यांनी जाहीर दिला.  

आपल्या परखड विचारांनी आणि उल्लेखनीय अशा साहित्यातून आपली ओळख निर्माण करणारे अन विविध पुरस्कारांनी सन्मानित पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच शिक्षण संस्थेतील काही महिलांनी अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर आपण पूर्णपणे निर्दोष आहोत,आपली नार्को चाचणी करा व दोषी आढळल्यास भर चौकात फाशी द्या असे म्हणणाऱ्या पद्मश्री लक्ष्मण माने यांची अगदी त्याच पद्धतीने  निर्दोष मुक्तता झाल्याने चळवळीतील कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे. 

पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यातर्फे  मोहन यादव यांनी अतिशय सूत्रबद्धपणे सर्व प्रकरणांची मांडणी करून उत्कृष्ठरीत्या बचाव पक्षाची बाजू मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला. 

अखेर सत्य हे लपत नसते ते सूर्यापेक्षाही तेज असते आणि आज सत्याचा विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या  कन्या प्रा. समता माने आणि भारतीय भटके विमुक्त शिक्षण संशोधन संस्थेचे संचालक प्रा. भाई शैलेन्द्र  माने यांनी दिली आहे.
छायाचित्र सौजन्य: डी एन ए 

पद्मश्री लक्ष्मण माने यांची महिला अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
परंपरेची ओळख देणारा कौतुकास्पद उपक्रम

हसत्या खेळत्या घराचं मानसिक आरोग्य नष्ट करणारे मोबाईल्स,त्यावरील थरारक गेम्स,टिव्हीवरील हॉरर फिल्स यापेक्षा किल्ला या विषयाकड मुलांना परत घेवून जाणारी

Close