‘कडेगावच्या डोल्यां’वर होणार डॉक्युमेंटरी !!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या कडेगावच्या ऐतिहासिक ताबूत परंपरेवर डॉक्युमेंटरी बनवण्याचे काम सुरु झाले असून लोकसांस्कृतिक परंपरांचे संशोधन आणि संवर्धन यामध्ये कार्यरत असणारी  “फोल्कस” ही संस्था हे काम करत आहे.

१९ व्या शतकाच्या अखेरच्या टप्यात सुरु झालेली कडेगावची ताबूत भेटीची परंपरा आजतागायत अव्याहतपणे सुरु आहे. आजपर्यंत, कोणत्याही संशोधन संस्थेने अथवा सरकारी संस्थेने यावर माहितीपट तयार करून हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा सर्वदूर जागतिक पातळीवर नेण्याचे काम हातात घेतले नव्हते. कडेगावचेच संशोधक डॉ. गोविंद धस्के गेली सात वर्षे ताबूत परंपरेविषयी संशोधन करत आहेत. त्यातूनच माहितीपटाची सूचना समोर आली आणि ‘फोल्कस’ संस्थेच्या सहकार्याने हे काम सुरु झाले आहे.

या माहितीपटासाठी मुख्य संशोधक म्हणून डॉ. गोविंद धस्के तसेच सौ. अनामिका धस्के काम करत असून पुण्याच्या सामाजिक शास्त्रज्ञ सौ. सुमती उनकुले-त्रिभुवन, लेखिका रश्मी मालापूर संशोधनामध्ये सहभागी आहेत. ‘कडेगावचे डोले’ अस नामकरण केलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन “फोल्कस” चे संस्थापक व पत्रकार अर्जुन धस्के करत आहेत. माहितीपटाची तांत्रिक बाजू तसेच संकलन कराडच्या ‘सिटी साऊंड’ चे माणिक बर्गे करत आहेत. छायाचित्रण व चित्रीकरण जहीर मिस्त्री तसेच मॅक्झिम-मिडीयाचे युवा तंत्रज्ञ मिलिंद धस्के, विशाल रासकर आणि शैलेश हळदे करत आहेत. ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’ चे विशेष प्रतिनिधी दिपक कोकणे माहिती संकलन करत आहेत. छायाचित्र पुस्तकावर विशेष काम मुंबईच्या ANCLICKS चे सोमदत न्हावकर व अमी न्हावकर करत आहेत.

कडेगावच्याच रहिवाश्यांनी पुढे येवून माहितीपट निर्मितीचे काम हाती घेतल्याने मोठ्या प्रमाणात कडेगावकर संशोधनामध्ये सहभागी होत आहेत. या कार्यात संस्थेतर्फे सहभागासाठी आवाहन करण्यात आले असून मोहरमविषयीची माहिती info@globalfolks.in या इमेल पत्त्यावर पाठवावी, असे सांगण्यात आले आहे.

 

shah-readymade

‘कडेगावच्या डोल्यां’वर होणार डॉक्युमेंटरी !!!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पद्मश्री लक्ष्मण माने यांची महिला अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता

सातारा: जेष्ठ विचारवंत, माजी आमदार "उपरा" कार पद्मश्री लक्ष्मण माने यांची आज सातारा न्यायालयाने सर्व सहा महिला अत्याचार प्रकरणातून निर्दोष

Close