कडेगावच्या डोल्यांना जागतिक व्यासपीठ देणारा ज्येष्ठ पत्रकार पीरजादे यांचा कौतुकास्पद प्रवास0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगावच्या डोल्यांना राज्य व राष्ट्र पातळीवर नेण्यासाठीचा, १९७१-७२ च्या सुमारास सुरु झालेला साहेबपीर पीरजादे  यांचा पत्रकारीतेचा प्रवास आजतागायत अव्याहतपणे सुरु आहे. कडेगावकरांच्या दृष्टीने कौतुकास्पद अशी ही परीक्रमा निश्चितच स्वागतार्ह आणि कडेगावच्या सांस्कृतिक इतिहासात भर घालणारी आहे.

१९ व्या शतकाच्या अखेरच्या काळात सुरु झालेले कडेगावचे ऐतिहासिक ताबूत तब्बल एक शतक कोणत्याही राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धीपासून दूर होते. तरुण वयातील साहब जी यांच्या उत्साहाला व स्वाभिमानाला शह देणारी ही गोष्ट होती. त्यावेळी प्रसिद्धी ही तितकी सहजासहजी होत नव्हती.

कडेगावचे डोले राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्याचा व त्यासाठी लागेल ते करण्याची तयारी असलेले पीरजादे अगदी सुरवातीला ‘दैनिक तरुण भारत’ च्या पुणे कार्यालयात पोचले. तत्कालीन (१९७१-७२ च्या सुमारास) सांगली परिसरात वर्तमानपत्रे नव्हती, सर्व वृत्तपत्रे पुण्यातून प्रसिद्ध व्हायची. त्या दरम्यान पुण्याला पोचलेले पीरजादे यांनी तरुण वयात लिहिलेला कडेगावच्या ताबूत परंपरेवरील लेख ‘तरुण भारत’ ने स्वीकारला परंतु काही दिवसात पीरजादे यांना फोन करून ताबूत संदर्भात छायाचित्र घेऊन स्वतः पुणे येथे येण्यास सांगितले. एवढ्या प्रयत्नानंतर ही ‘तरुण भारत’ च्या संपादकीय विभागाने लेख प्रसिद्ध करण्याची हमी दिली नाही. तेव्हा पीरजादे यांनी खड्या शब्दात आपली भूमिका मांडून तत्कालीन वृतपत्र विभागाला नमते घ्यायला लावले. अशाप्रकारे कडेगावच्या डोल्यांवर अगदी पहिला लेख खूप प्रयत्नाने ‘तरुण भारत’च्या रविवारच्या पुरवणीत प्रसिद्ध झाला.

vlcsnap-error449

त्यांनतर, दुसरा लेख १९७३-७४ साली ‘दैनिक विशाल’ सह्याद्री पुणे येथे प्रसिद्ध झाला. तर तिसरा लेख ७५-७६ च्या सुमारास दैनिक केसरी मध्ये प्रसिद्ध झाला. तेव्हापासून मागे वळून न बघता पीरजादे  हे पत्रकार या नात्याने दरवर्षी किमान दोन लेख (१९७२ पासून) प्रसिद्ध करत आलेत. इंडियन एक्स्प्रेस, आकाशवाणी, दूरदर्शन इथेही कडेगावचे मोहरम पोहोचले ते पीरजादे यांच्यामुळेच. १९७९ साली ‘दूरदर्शन’वर पहिल्यांदा कडेगावचे ऐतिहासिक ताबूत दाखवण्यासाठी पीरजादे  यांनी प्रयत्न केले व त्याला यश आले.

vlcsnap-error090

तब्बल ३० वर्षाच्या प्रयत्नानंतर सध्या ‘कडेगावचे डोले’ फक्त राज्य नव्हे तर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहेत. या कामी साहेबपीर पीरजादे यांची पत्रकारितेमधील व्यावसायिक निष्ठा आणि कडेगावच्या ताबूत परंपरेवर असणारे प्रगाढ प्रेम व श्रध्दाच कारणीभूत आहे.

साहेबपीर पीरजादे  हे कडेगावच्या ताबूत परंपरेची स्थापना करणारे प्रमुख संत सैय्यद पीर साहेब हुसैन पीरजादे यांचे नातू.

आजही अथकपणे स्वतःच्या शारीरिक समस्यांना न जुमानता पत्रकार पीरजादे कडेगावच्या ताबूतचा इतिहास उलगडून सांगतात. अलीकडेच “Fraternity of Local Knowledge Saviours (FOLKS)” या संस्थेने सुरु केलेल्या ‘कडेगावचे डोले’ या संशोधनात्मक माहितीपटालाही पीरजादे मार्गदर्शन करत आहेत.

आपल्या मातीतील परंपरा आणि संस्कृती यासंदर्भात पत्रकाराची भूमिका काय असावी, याचा एक आदर्श वस्तुपाठ साहेबपीर पीरजादे यांनी आपल्या कार्यातून निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याला ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’चा सलाम !!!

छायाचित्र: मिलिंद (बंटी) धस्के व विशाल रास्कर

कडेगावच्या डोल्यांना जागतिक व्यासपीठ देणारा ज्येष्ठ पत्रकार पीरजादे यांचा कौतुकास्पद प्रवास

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नमस्कार, जपान !!!

जपान म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो हीरोशिमा आणि नागासाकीचा अंगावर आजही शहारे आणणारा इतिहास. राखेतुन झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे

Close