मलाही नगरसेवक व्हायचंय !!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (दीपक कोकणे) : कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या नगरसेवकपदासाठी इच्छुकांची तोबा गर्दी दिसत आहे. कोणत्या पक्षाकडून,  गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, याची जोरदार चाचपणी सुरु आहे. यासंदर्भात देशमुख गटाने काल एक मोठी डिनर बैठक घेवून प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. कदम गटाने गुरुवारी चाचपणी मीटिंग घेतली आहे.

कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. अलीकडेच निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहिर केला. त्यानंतर इथल्या राजकीय हालचालींनी  वेग घेतला. निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रत्येकालाच संधी देण अवघड असतं. अशा वेळी समजूत कुणाची काढायची, याची मोठी डोकेदुखी राजकीय गटांसमोर असते. इच्छुक उमेदवारही या ना त्या गटाकडून उमेदवारी मिळवायचीच, या हेतूनं दोन्हीकडे संधान साधुन असतो.

या निवडणुकीसाठी सुमारे शंभरावर इच्छुक आहेत. आता कोण कोणाच्या गटाकडून उमेदवारी मिळवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, देशमुख गटाने नुकतीच एक बैठक घेवून इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली. कदम गटाच्या हालचालीनाही जोर आला आहे.

वरकरणी ओबीसी महिला नगराध्यक्ष असल्याने फारसा उत्साह नसल्याचे चित्र काही कार्यकर्त्यांकडून रंगवले जात असले तरी अत्यंत गुप्तता ठेवून उमेदवार ठरवणे प्रक्रिया प्रत्येक प्रभागामध्ये सुरु आहे.

shah-readymade

मलाही नगरसेवक व्हायचंय !!!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावच्या डोल्यांना जागतिक व्यासपीठ देणारा ज्येष्ठ पत्रकार पीरजादे यांचा कौतुकास्पद प्रवास

कडेगाव : कडेगावच्या डोल्यांना राज्य व राष्ट्र पातळीवर नेण्यासाठीचा, १९७१-७२ च्या सुमारास सुरु झालेला साहेबपीर पीरजादे  यांचा पत्रकारीतेचा प्रवास आजतागायत

Close