शिवसेना पलूस नगरपरिषदेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार : प्रा. नितीन बानुगडे-पाटील0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलुस : नगरपरिषदेच्या सर्व १७ जागा शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढवणार असून कोणत्याही स्थितीत पलुस पालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितिन बानुगडे-पाटील यांनी दिला. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल पाटील, सौ. सोनल पाटील यांनी सहका-यासमवेत शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, लाला गोंदील , संजय विभूते, प्रशांत लेंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

img-20161022-wa0015

पलुसमधील सामान्य जनता आणि शेतकरी यांचे हित शिवसेना जोपसणार असून त्यासाठी सत्तेत असून भांड़ावे लागले तरी चालेल, असेही प्रा. बानुगडे-पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी पै. श्रीकांत लेंगरे, विनायक गोंदील,किशोर माळी,श्रीरंग सांडगे, संकेत फाळके, जगदीश पवार, शरद गायकवाड, महेंद्र पोतदार, गुंडा दिवाण, तसेच महेश शिंदे हे मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
shah-readymade

शिवसेना पलूस नगरपरिषदेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार : प्रा. नितीन बानुगडे-पाटील

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
अनेक कार्यकर्त्यांचा ‘भाजप’ मध्ये प्रवेश

कडेगाव (दिपक कोकणे): कडेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापली पक्ष संघटना बळकट करण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरु आहेत. काल कडेगाव इथे झालेल्या

Close