पलूस ची निवडणूक भाजप ताकदीने लढणार: पृथ्वीराज देशमुख0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: भाजपा चे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पलूसची नगरपरिषद निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत काल दिले. सर्व शक्ती पणास लावून भाजप पलूस ची निवडणूक लढेल अशी  ग्वाही त्यांनी दिली. पलूसमध्ये नगर विकासासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नाही व त्यामुळे नवीन विकास योजनांना जागा उरली नाही ही बाब येत्या निवडणुकीत विकासप्रश्नांवर महत्वाची ठरणार आहे असे प्रतिपादन केले.

पलूस मध्ये भाजपची पक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने वाढ होत असून लोकांमध्ये चांगले मत आहे त्यामुळे यावेळी भाजपा निवडणुकीमध्ये अजिबात मागे पडणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमर इनामदार तसेच पलूस तालुका अध्यक्ष विजय पाटील व इतर अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

shah-readymade

पलूस ची निवडणूक भाजप ताकदीने लढणार: पृथ्वीराज देशमुख

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘शिराहामा’ची ‘सॉलिड’ कचरा व्यवस्थापन व्यवस्था

जपानच्या स्वच्छतेच्या आदर्शाबद्दल अगदी लहानपासून परदेशी पर्यटक आणि लहान जपानी मुलीची कथा ऐकत आलेल्या मला जपानच्या स्वच्छता यंत्रणेविषयी उत्सुकता असणे

Close