पलूसमध्ये पाणी, गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  पलूसमध्ये जनमत चाचणी व समस्या याबाबत नुकतीच चर्चा घेण्यात आली. यामध्ये ‘कांग्रेस’ चे सुहास पुदाले, ‘राष्ट्रवादी’ चे माळी बापु तसेच ‘शिवसेने’चे लालासाहेब गोंदिले, ‘भाजपा’ चे अमर इनामदार व ‘स्वाभिमानी विकास आघाडी’ चे बापूसाहेब येसुगडे ह्यांच्या उपस्थितीत चर्चासत्र पार पडले.

कालच्या चर्चासत्रावरुन हे निदर्शनास आले की कांग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, व स्वाभिमानी विकास आघाडी हे सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची जास्त शक्यता आहे. जनमताप्रमाणे लोकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. पलूसमधील पार्किंगचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. शहरीकरणामुळे तयार होत असलेल्या गुंठेवारीसारख्या समस्या व पाणीपुरवठा व्यवस्था यावरची चर्चा लक्षवेधक राहिली.

राजकीय वातावरला साजेसे अप्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या आरोप देखील झाले. पलूस नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय हालचालीनां वेग आला आहे. रात्री  उशिरापर्यंत स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या मिटिंग सुरु झालेल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.

पलूसमध्ये पाणी, गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लेख पहिला : शोध स्वत्वाचा

भूमितीमधे एका बिंदूच अस्तित्व त्याची त्रिज्या आणि त्या त्रिज्येतून तयार होणाऱ्या परिघातून निर्माण होते. या अस्तित्वाचे रूपक जर कोणत्याही व्यक्तीस

Close