‘मैत्र’ च्या किल्ला स्पर्धेची कडेगाव मध्ये उत्साहात सांगता0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: ‘मैत्र प्रतिष्ठान’ ने आयोजित केलेल्या भव्य किल्ला स्पर्धेची सांगता आज रंगतदार पद्धतीने झाली. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आले. मुख्य बक्षीस समारंभ कडेगाव येथील विठ्ठल मंदिरात सकाळी संपन्न झाला.

आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. संतोष डांगे यांनी केले. ‘मैत्र’ चे अध्यक्ष मा. श्रीकांत पालकर यांनी प्रास्ताविक केले, तर आभार प्रदर्शन श्री. प्रवीण नायकवडी यांनी केले. सर्वश्री अभिमन्यू वरुडे, बद्रीनाथ धस्के, विनायक सुतार व मा. पांडुरंग डांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि ‘मैत्र’ च्या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमास मा. पांडुरंग डांगे, मा. अकबर लेंगरेकर, मा. फिरोज बागवान व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.

‘मैत्र’ कडून सर्वश्री नितीन शिंदे, सचिन पोळ, शंकर नायकवडी, अनंत पवार, सुरेश माळी, अमोल सगरे, व प्रवीण भोसले यांनी स्पर्धा व कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये मुख्य भूमिका बजावली.

कार्यक्रमास सर्व प्रायोजक व ‘मैत्र प्रतिष्ठान’ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या मित्रांचे किल्ला स्पर्धेतील यश अनुभवण्यासाठी अनेक लहान मुलांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.

यंदाचा ‘मैत्र प्रतिष्ठान भव्य किल्ला स्पर्धा २०१६’ चे विजेते व त्यांनी घडवलेले पुरस्कारप्राप्त किल्ले पुढील प्रमाणे आहेत:

प्रथम पारितोषिक : आदित्य अशोक शिंदे (३३३३ रुपये सर्वश्री भीमराव मोहिते व बद्रीनाथ धस्के यांचे वतीने )

img-20161105-wa0010

 

द्वितीय पारितोषिक: रोहन कृष्णत मांडवे (२२२२ रुपये श्री. अभिमन्यू वरुडे यांचे वतीने )

wp-1478346272826.jpg

तृतीय पारितोषिक: चैतन्य शरद सूर्यवंशी (कडेगावकर कुटुंबियांच्या वतीने )

img-20161105-wa0012

चतुर्थ पारितोषिक: निहाल अहमद इनामदार (श्री. फिरोज बागवान यांचे वतीने)

img-20161105-wa0013

पंचम पारितोषिक: अभिजित मोरे (श्री. प्रविण भोसले यांचे वतीने)

img-20161105-wa0014

 

वरील मुख्य पारितोषिकांसोबत इतर २० स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.  तसेच, सर्व विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

उत्तेजनार्थ बक्षिसे कै. बाबुराव गोविंद डांगे (अण्णा) यांचे स्मरणार्थ देण्यात आली. सर्व विजेत्यांना श्री. जमीर लेंगरेकर (उपायुक्त, उल्हासनगर महानगरपालिका) यांचे मार्फत पुस्तक संच देण्यात आला.

या स्पर्धेसाठी ‘मैत्र’ च्या टिम सोबतच प्रायोजकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि स्पर्धेच्या संयोजनातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. यामध्ये मुख्यत्वे श्रीकांत हार्डवेअर, समर्थ अग्रो सर्विसेस, मल्हार कन्स्ट्रक्शन, ओम मार्बल आणि ग्रानाईट, श्रेया वेल्डिंग वर्क्स आणि स्टील फर्निचर, महावीर स्टील, विजय ज्वेलर्स, पाटील कन्स्ट्रक्शन, सायली फर्निचर, साई बेकर्स, OK कन्स्ट्रक्शन, श्रद्धा सर्वजल अक्वाश्रीजय मार्केटिंग, सोमेश्वरी हार्डवेअर, लोखंडे मसाले, व जगदंबा माता सप्लायर्स यांचा समावेश होता.

‘मैत्र प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित केली जाणारी किल्ला स्पर्धा पुढील वर्षी यापेक्षाही भव्य करण्यात येईल व बक्षिसाची रक्कम वाढवण्यात येईल असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.

untitled-3

Leave a Reply

Your email address will not be published.

‘मैत्र’ च्या किल्ला स्पर्धेची कडेगाव मध्ये उत्साहात सांगता

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून व्ही. व्ही. देशमुख यांची नियु्क्ती

सांगली : सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2016 साठी निवडणूक निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त व्ही. व्ही. देशमुख

Close