……आता बोला बिनधास्त !!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

आमच्या ऐतिहासिक कडेगाव आणि पलूस नगरीत मोठया वेगाने प्रगती होत आहे. ग्रामपंचायतीची नगरपंचायतही झाली. नगरपंचायतीची नगरपरिषद  झाली. याबददल कडेगाव आणि पलूस नगरीचा कारभार पाहणा-या सर्व कारभा-यांना मनापासून धन्यवाद !!!

शहर वाढू लागलं की विकासाची आव्हानं, लोकांच्या अपेक्षाही वाढू लागतात. प्रचाराच्या माहोलमध्ये सभांमधुन मोठमोठी आश्वासने बिनदिक्कत दिली जातात. परंतु या समस्या सोडवण्यासाठी काय होमवर्क करावे लागेल, कसा निधी मिळवावा लागेल, त्यासाठीची तांत्रिक उपलब्धता आहे काय, नागरीकांच्या अपेक्षा काय आहेत, याचाही लोकप्रतिनिधींनी जरूर अभ्यास करण्याची गरज असते,किंबहुना असा अभ्यास करून आश्वासन देणा-या आणि पुर्तता करणा-या उमेदवारांनाच आपण निवडून देण्याची गरज असते. एकदा का आपण फसलो की पाच वर्ष निमुटपणे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.

निवडणूका दर पाच वर्षांनी येतात. मात्र विकासाच्या वाटेवर असणा-या शहरासाठी ही पाच वर्षे पन्नास वर्षांहून अधिक आहेत.

सर्वच मतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना न भूलता याचा गांर्भीयाने विचार करने हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे.

कडेगाव- पलुस लाईव न्यूज च्या माध्यमातुन आम्ही आपल्याला याबाबत आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

कडेगाव आणि पलुस तालुक्यातील सामान्य नागरीकांनी आपली मते, सुचना, अपेक्षा आणि उमेदवारांना काही संदेश दयायचे असतील तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवावेत. आम्ही आमच्या माध्यमातुन ते हजारो वाचकांपर्यत, उमेदवारांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत जरूर पोहोचवू.

मग, आता कसला विचार करताय? पाठवा आपल्या प्रभागातील समस्या आणि तुमच्या सुचना…

 

संपादक

कडेगाव-पलूस लाईव न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published.

……आता बोला बिनधास्त !!!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘मैत्र’ च्या किल्ला स्पर्धेची कडेगाव मध्ये उत्साहात सांगता

कडेगाव: 'मैत्र प्रतिष्ठान' ने आयोजित केलेल्या भव्य किल्ला स्पर्धेची सांगता आज रंगतदार पद्धतीने झाली. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून

Close