पूर्वप्राथमिक शिक्षण समस्यांवर सुमती उनकुले यांचा शोधप्रबंध बेंगळूरू येथे सादर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‘फिफ्थ डायमेन्शन इनोवेषण’ इथे शोधकार्य करत असणाऱ्या बालशिक्षण तज्ञ सुमती उनकुले यांचा ‘ पुण्यातील खाजगी पूर्वप्राथमिक शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठीच्या  कार्यव्यवस्था व त्यातील समस्या’ या विषयावरचा प्रबंध बेंगळूरू येथे सादर करण्यात आला.

‘भारतांमधील शिशुविकास व्यवस्था व त्यामधील आव्हाने’ या मुख्य विषयाला वाहिलेल्या राष्ट्रीय परिसंवादात सुमती यांनी शिशुविकास संस्थामधील शिक्षण गुणवत्ता व कर्मचारी वर्गाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केले.

या परिसंवादाचे आयोजन AECED, अझीम प्रेमजी विद्यापीठ व UNICEF यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळूरू येथील ललित अशोक हॉटेल येथे ७ ते ९ नोव्हेम्बर दरम्यान करण्यात आले. या परिसंवादामध्ये देशातील व परदेशातील नामवंत शिक्षणतज्ञांनी भाग घेतला होता.

कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत बोलताना सुमती उनकुले यांनी शोधप्रबंधामधील महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

खाजगी संस्थामध्ये सरकारी शाळांच्या तुलनेत जास्त सुविधा व शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याचा सार्वत्रिक समज तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बऱ्याचदा खाजगी शिशुविकास संस्था फक्त फायद्याचा विचार करत असल्याचे दिसून येते असे त्यांनी स्पष्ट केले.

सुमती यांनी त्यांच्या संशोधनावर आधारीत मुद्दे समोर मांडताना खाजगी शिक्षण संस्था व त्याविषयीच्या दर्जा, गुणवत्ता व सुविधांच्या बाबतीत असलेल्या सार्वजनिक गैरसमजांमुळे व अश्या गोष्टींच्याबद्दल असणाऱ्या पालकांमधील माहितीच्या अभावामुळे एक वेगळी “क्लास-रचना” समाजामध्ये तयार होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

अश्या आर्थिक वर्गांवर आधारीत रचनेचा अवलंब पूर्वप्राथमिक शिक्षण पातळीवरच सुरु होणे मुलांच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासठी हानिकारक असल्याचे त्यांनी नमूद केले व अश्या रचनेमुळे शिक्षणाचा मूळ घटनात्मक उद्देश असफल होत असल्याचे मत मांडले.

पूर्व प्राथमिक शिक्षक गटाच्या विशेष समस्या अधोरेखित करताना शैक्षणिक संस्थांकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लाक्षांकडे त्यांनी लक्ष वेधले. बऱ्याचदा तथाकथित श्रीमंत शाळांमध्येसुद्धा पूर्वप्राथमिक शिक्षकांना पुरेसा पगार व सुविधा दिल्या जात नसल्याचे उनकुले यांनी संशोधनाच्या माध्यमातून दाखवून दिले.

11951295_10153498849545516_6775860060749589454_n

सुमती उनकुले या पूर्वप्राथमिक शिक्षण व्यवस्थेवर संशोधन करणाऱ्या देशातील मोजक्या संशोधकांपैकी एक आहेत.

सध्या त्या पुण्यातील सरकारी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता याबाबत संशोधन करत आहेत. त्यांच्या संशोधनावर आधारीत मुले, पालक, तसेच शिक्षकांसाठीचे काही अभिनव उपक्रम व प्रशिक्षण  ‘सेल्फहूड‘ ही संस्था पुणे तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये राबवत असते.

 

जाहिरात

untitled-3

Leave a Reply

Your email address will not be published.

पूर्वप्राथमिक शिक्षण समस्यांवर सुमती उनकुले यांचा शोधप्रबंध बेंगळूरू येथे सादर

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सुरेश देशमुख (दुबे नाना), महादेव लोखंडे, आणि आबासाहेब पाटील यांचा कॉंग्रेस प्रवेश

कडेगाव: नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेगावचे ज्येष्ठ व मुरब्बी नेते मा. सुरेश देशमुख (दुबे नाना), उद्योजक महादेव लोखंडे, उद्योजक युवराज मोरे,

Close